आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतही टिकटॉकवर बंदी:ट्रम्प यांनी बॅन केले टिकटॉक, 45 दिवसांनंतर लागू होणार आदेश, म्हणाले - राष्ट्रीय सुरक्षेसाठी कारवाई आवश्यक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मायक्रोसॉफ्टने टिकटॉकचा अमेरिकन व्यवसाय खरेदी करण्याची योजना आखली आहे
  • टिकटॉकवर भारताने बंदी घातली आहे, अमेरिकेने या निर्णयाचे कौतुक केले होते

भारतानंतर अमेरिकेनेही चिनी अॅप टिकटॉकवर बंदी घातली आहे. या आदेशावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्सवर बंदीच्या आदेशावर गुरुवारी स्वाक्षरी केली. त्यानुसार, 45 दिवसांनंतर ही बंदी लागू होईल. टिकटॉकबरोबर चिनी अॅप वीचॅटवरही बंदी घालण्यात आली आहे.

आदेशानुसार अमेरिका डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्योरिटी, ट्रान्सपोर्टेशन सिक्योरिटी अॅडमिनिस्ट्रेशन आणि आर्म्ड फोर्सेसमध्ये टिकटॉकचा वापर यापूर्वीच बंद करण्यात आला आहे.

ट्रम्प म्हणाले- चीनला टिकटॉकच्या माध्यमातून हेरगिरी करण्याची संधी मिळते
ट्रम्प यांनी म्हटले आहे की चिनी अॅप्स राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहेत. यावेळी, टिकटॉवर कारवाईसाठी विशेषतः आदेश जारी करण्यात आला आहे. टिकटॉक आपोआप वापरकर्त्याची माहिती प्राप्त करते.

अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षाचा आरोप आहे की, टिकटॉकच्या माध्यमातून चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला अमेरिकन लोकांच्या जीवनात डोकावण्याची संधी मिळते. याद्वारे हे अमेरिकन कर्मचारी आणि कंत्राटदारांचे स्थान, व्यवसायासंबंधीत आणि वैयक्तिक माहिती घेऊ शकतो. तसेच त्या आधारे माहिती घेऊन ब्लॅकमेल करू शकते.

मायक्रोसॉफ्टच्या प्रस्तावित करारावर काय परिणाम होईल?
अमेरिकन टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट टिकटॉकचा अमेरिकन व्यवसाय खरेदी करण्यासाठी चर्चेत आहे. जर टिकटॉकला हा करार करायचा असेल तर आता त्याला दीड महिन्यांत व्यवहार करावा लागेल. जर हा करार झाला तर वापरकर्त्याच्या डेटाच्या सुरक्षेसाठी ते काय ते काय करतील? याविषयी मायक्रोसॉफ्टने स्पष्टपणे सांगितलेले नाही.

भारताने आतापर्यंत 106 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे
अमेरिकेपूर्वी भारतानेही चिनी अ‍ॅपविरोधात डिजिटल स्ट्राइक केला आहे. जूनच्या अखेरीस, भारताने टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. त्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात, चीनमधील आणखी 47 अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...