आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मॅनहॅटन कोर्टाने गुन्हेगारी खटला चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर ट्रम्प 4 एप्रिल रोजी आत्ममर्पणाच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी आपल्या राष्ट्रपतीपद कॅम्पेनच्या माध्यमातून गेल्या 24 तासांत 40 लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास 32 कोटी 87 लाख रुपये गोळा केले आहेत. तर ट्रम्प यांचे घर मार-ए-लागो, ट्रम्प टॉवर आणि मॅनहॅटन कोर्ट हाऊसबाहेर सुरक्षा वाढवली आहे.
तर गुन्हेगारी खटला चालण्याचे वृत्त पसरताच ट्रम्प यांचे समर्थकही सक्रिय झाले आहेत. शुक्रवारी फ्लोरिडात ट्रम्प यांचे निवासस्थान पाम बीच इस्टेटच्या मार-ए-लागोबाहेर समर्थकांची गर्दी गोळा झाली. अनेक रिपब्लिकन समर्थक व्हाइट हाऊसबाहेर ट्रम्प यांच्या सेव्ह अमेरिका घोषवाक्यांच्या टोप्या आणि दुसरे सामान विकताना दिसले.
पोलिसांना सुट्यांवरून माघारी बोलावले
दुसरीकडे, वॉशिंग्टनमध्ये कॅपिटल पोलिस आणि सार्जंटसना देशभरात संभाव्य आंदोलनाविषयी इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी सुटीवर गेलेल्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना ड्युटीवर परतण्यास सांगितले गेले आहे. न्यूयॉर्कमध्ये अनेक पोलिस अधिकारी रस्त्यांवर टेहळणी करताना दिसले. याशिवाय मॅनहॅटन कोर्टहाऊसबाहेरही सीसीटीव्ही कॅमेरा तपासले गेले आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या टीम तैनात करण्यात आल्या.
ट्रम्प यांच्या आत्मसमर्पणाविषयी तपास सुरू
न्यूयॉर्क टाइम्सनुसार, ट्रम्प 3 एप्रिल रोजी फ्लोरिडाहून न्यूयॉर्कला पोहोचतील. ते तिथे रात्री ट्रम्प टॉवरमध्ये थांबतील आणि सकाळी मॅनहॅटनच्या कोर्टहाऊसमध्ये आत्मसमर्पण करतील. यादरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी न्यूयॉर्क फील्ड ऑफिसचे सीक्रेट सर्व्हिस एजंटस मॅनहॅटन कोर्टहाऊसमध्ये पोहोचले. एजंटस म्हणाले की ट्रम्प फ्लोरिडाच्या मार-ए-लागोहून न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प टॉवरवर पोहोचण्यापर्यंत सुरक्षेसाठी अनेक एजंटसची गरज भासेल.
ट्र्म्प यांनी समर्थकांना केले होती पैसे गोळा करण्याचे आवाहन
गुन्हेगारी खटला चालण्याची घोषणा होताच ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेकडून निधी गोळा करण्यासाठी अनेक ई-मेल पाठवण्यात आले. यापूर्वी गुरुवारी माजी राष्ट्राध्यक्षांनी आपल्या समर्थकांना केस लढण्यासाठी पैसे गोळा करण्याचे आवाहन केले होते. यानंतर ट्रम्प यांनी 24 तासांच्या आत 32 कोटी 87 लाख रुपये गोळा केले.
5 पॉइंटमधून समजून घ्या पॉर्नस्टारला पैसे देण्याचे पूर्ण प्रकरण
1. पॉर्नस्टारला पैसे देऊन गप्प करण्याचे प्रकरण 2006 मधील आहे. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प एक रिअल इस्टेट व्यावसायिक होते. पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनिएल्स तेव्हा 27 वर्षांच्या होत्या आणि ट्रम्प 60 वर्षांचे होते. जुलै 2006 मध्ये एका गोल्फ टुर्नामेटदरम्यान दोघांची भेट झाली होती.
2. स्टॉर्मीनी आपले पुस्तक फूल डिस्क्लोजरमध्ये या भेटीचा उल्लेख केला आहे. तिने सांगितले की जेव्हा त्यांची ट्रम्प यांच्याशी भेट झाली होती, तेव्हा त्यांची तिसरी पत्नी मेलेनियांनी मुलगा बॅरनला जन्म दिला होता. बॅरनच्या जन्माला केवळ 4 महिनेच झाले होते.
3. आपल्या पुस्तकात स्टॉर्मीनी सांगितले की ट्रम्प यांच्या बॉडीगार्डसनी त्यांना एका स्टार पेंटहाऊसमध्ये डिनरसाठी बोलावले होते. पुस्तकात त्यांनी ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध आणि त्यांच्या शारीरिक रचनेचाही उल्लेख केला होता. यानंतर दोघांत अफेअर सुरू झाले होते.
4. आरोप आहे की, 2016 मध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या ठिक आधी ट्रम्प यांनी स्टॉर्मीला गप्प राहण्यासाठी पैसे दिले होते. ट्रम्प यांच्या वकिलांनीही याची कबुली दिली होती की, त्यांनी ट्रम्प यांच्या वतीने पॉर्नस्टारला 1 लाख 30 हजार डॉलर सुमारे 1 कोटी 7 लाख रुपये दिले होते.
5. ट्रम्प यांच्याकडून पॉर्नस्टारला दिलेल्या पेमेंटचा खुलासा जानेवारी 2018 मध्ये वॉलस्ट्रीट जर्नलने केला होता. या आधारे ट्रम्प यांच्याविरोधात गुन्हेगारी खटला चालवण्याचा निर्णय घेतला गेला. ते अमेरिकेचे पहिले असे राष्ट्राध्यक्ष आहेत. ज्यांच्याविरोधात गुन्हेगारी खटला चालणार आहे.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.