आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मंगळवारी मॅनहॅटन न्यायालयात 34 आरोप ठेवण्यात आले. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सचे तोंड बंद करण्यासाठी पैसे दिल्याबद्दल आणि त्यासाठी व्यावसायिक रेकॉर्ड खोटे सिद्ध केल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर कोर्टात खटला चालवला गेला. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयात सांगितले की, त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. तसेच त्यांच्या व्यवसायाच्या नोंदींमध्येही तफावत आढळलेली नाही. विशेष म्हणजे मॅनहॅटन कोर्टाने ट्रम्प यांच्या जामीन किंवा अटकेवर निर्णय दिला नाही. CNN च्या वृत्तानुसार, पुढील सुनावणी 4 डिसेंबरला होणार आहे.
सुनावणीनंतर ट्रम्प घरी पोहोचले, समर्थक आणि मीडियांच्या उपस्थितीत त्यांनी 25 मिनिट भाषण केले. त्यांच्या भाषणातील तीन महत्त्वाचे मुद्दे
1. मी निर्भयपणे देशाला विनाश होण्यापासून वाचवले
57 मिनिटांच्या सुनावणीनंतर ट्रम्प न्यूयॉर्कहून त्यांच्या फ्लोरिडा येथील घर 'मार-ए-लागो' येथे पोहोचले. येथे त्यांनी जनता आणि माध्यमांमध्ये भाषण केले. ट्रम्प म्हणाले- अमेरिकेच्या इतिहासात असे काही घडेल असे मला कधीच वाटले नव्हते. माझ्या देशाचा विध्वंस करू इच्छिणाऱ्यांपासून निर्भयपणे मी रक्षण केले आहे. हा एकमेव गुन्हा मी केलेला आहे.
2. अमेरिका नरकात जात आहे
ट्रम्प म्हणाले - आपला देश नरकात जात आहे. जग आपल्यावर हसत आहे. माझ्याविरुद्ध ठोस पुरावा नाही. कोणी केसच करत नाही, असेही कायदेतज्ज्ञ सांगतात. 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो तात्काळ फेटाळला जावा, अशी मागणी राहील
3. असे जज सुनावणी करित आहेत, जे माझा तिरस्कार करतात
ट्रम्प यांनी भाषणात न्यूयॉर्क सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जुआन मार्चेन यांच्या मुलीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, सुनावणी अशा न्यायाधीशाने केली आहे, जे माझा तिरस्कार करतात. न्यायाधीशाची पत्नी आणि तिचे संपूर्ण कुटुंब माझा तिरस्कार करते. न्यायाधीशांची मुलगी कमला हॅरिससाठी काम करते. आता त्यांना बायडेन- हॅरिस यांच्या माध्यमातून पैसे मिळू लागले आहेत.
आधी सरेंडर त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देखील गेले होते ट्रम्प
भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास ट्रम्प यांनी न्यायालयाबाहेर आत्मसमर्पण केले. यानंतर न्यूयॉर्क पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ट्रम्प यांना एका खोलीत नेण्यात आले आणि त्यांच्या बोटांचे ठसे आणि छायाचित्रे घेण्यात आली. हे कोर्ट आणि पोलिस रेकॉर्डचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर त्यांना न्यायधीशांसमोर हजर करण्यात आले.
ट्रम्पचे प्रकरण बायडेनसाठी मोठी समस्या नाही : व्हाईट हाऊस
दरम्यान, व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रकरण हा जो बायडेनसाठी मोठा मुद्दा नाही. ट्रम्प यांच्या न्यायालयात हजर राहण्याबाबत व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरीन जीन-पियरे यांनी सांगितले - ट्रम्प यांच्यावरील खटला नक्कीच बातम्या बनवेल. परंतु सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. आम्ही यावर भाष्य करणार नाही. यामध्ये आपण लक्ष देण्यासारखे काहीही नाही. अमेरिकन जनतेला महागाईपासून दिलासा देण्यावर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा भर आहे.
कायद्यापुढे सर्व समान आहेत - अल्विन ब्रॅग
डोनाल्ड ट्रम्प प्रकरणाचा तपास करणारे मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नी अल्विन ब्रॅग म्हणाले - आम्ही गंभीर गुन्ह्याचे सामान्यीकरण करू शकत नाही आणि करणार नाही. तुम्ही कोणीही असलात तरी तुमच्यावर कारवाई केली जाईल. कायद्यापुढे सर्व समान आहेत याची आम्ही खात्री देत आहोत.
कोर्ट परिसर व पत्र परिषदेच्या घटनेचे काही फोटो...
ट्रम्प यांनी केली होती व्हिडीओ-फोटोग्राफीवर बंदी घालण्याची मागणी
यापूर्वी ट्रम्प यांच्या वकिलांनी शरणागतीदरम्यान न्यायालयात व्हिडिओ किंवा फोटोग्राफीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. कोर्टाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले होते - ट्रम्प यांच्यावरील फौजदारी खटल्याबाबत देशात आधीच सर्कशीचे वातावरण आहे. अशा स्थितीत शरणागतीचे मीडिया कव्हरेज आणखी वाईट करेल. त्यामुळे कोर्ट रूमची प्रतिष्ठा कमी होईल.
ट्रम्प म्हणाले होते - आम्हाला आमचा देश पुन्हा महान बनवायचा
4 मार्च रोजी ट्रम्प अमेरिकन वेळेनुसार दुपारी 12.20 च्या सुमारास फ्लोरिडातील त्यांचे घर 'मार-ए-लागो' सोडले. खासगी जेटने पहाटे 3.50 वाजता ते न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरवर पोहोचले. यादरम्यान ते सोशल मीडियावर म्हणाले - आपल्याला आपला देश परत घ्यायचा आहे. अमेरिकेला पुन्हा महान बनवायचे आहे.
हे ही वाचा
कोर्ट सुनावणी:सरेंडरसाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले डोनाल्ड ट्रम्प, कोर्टरूममध्ये व्हिडिओग्राफीवर बंदी
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर आणि नंतर तिचे तोंड बंद करण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी ते मंगळवारी कोर्टात हजर राहणार आहे. दुपारी 12:20 च्या सुमारास ट्रम्प फ्लोरिडातील त्यांच्या मार-ए-लागो घरातून बाहेर पडले. - येथे वाचा संपूर्ण बातमी
ट्रम्प यांनी खटला लढवायला 24 तासांत उभारले 32 कोटी : व्हाइट हाऊसबाहेर समर्थक गोळा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मॅनहॅटन कोर्टाने गुन्हेगारी खटला चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर ट्रम्प 4 एप्रिल रोजी आत्ममर्पणाच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी आपल्या राष्ट्रपतीपद कॅम्पेनच्या माध्यमातून गेल्या 24 तासांत 40 लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास 32 कोटी 87 लाख रुपये गोळा केले आहेत. तर ट्रम्प यांचे घर मार-ए-लागो, ट्रम्प टॉवर आणि मॅनहॅटन कोर्ट हाऊसबाहेर सुरक्षा वाढवली आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी
पाय खोलात : डोनाल्ड ट्रम्पवर चालणार फौजदारी खटला, प्रथमच माजी अध्यक्षांवर अशी केस
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला चालेल. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन ग्रँड ज्यूरींनी गुरुवारी त्यांच्यावर हा खटला चालवण्याचा निर्णय दिला. 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी पॉर्न स्टारशी असणारे अफेअर व तिला शांत राहण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी ट्रम्प यांच्यावर हा खटला चालेल. अशा खटल्याचा सामना करणारे ट्रम्प अमेरिकेचे पहिले माजी अध्यक्ष ठरलेत. कोर्टाने त्यांच्यावर कोणते आरोप ठेवलेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी
पॉर्नस्टार स्टॉर्मी 2006 मध्ये ट्रम्प यांना भेटली : भेटी-गाठी, अफेअर आणि तोंड बंद ठेवायला 1 कोटी; प्रकरण अटकेपर्यंत कसे गेले?
दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये, आपण डोनाल्ड ट्रम्प आणि पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डॅनिएल्सशी संबंधित संपूर्ण कथा आणि ट्रम्प यांच्या अटकेनंतरची संपूर्ण परिस्थिती जाणून घेणार आहोत. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.