आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Donald Trump US Army | US Election 2020 News Update; What Happens If Trump Not To Leave White House? Know Everything About

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

US इलेक्शन नॉलेज:पराभूत झाल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडण्यास नकार दिला तर काय होईल?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेमध्ये नेहमी 20 जानेवारीला नवीन राष्ट्राध्यक्ष शपथ घेतो. याला इनॉगरेशन डे म्हटले जाते.

अमेरिकेमधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल पूर्णपणे स्पष्ट होऊ शकलेला नाही. शुक्रवारी काउंटिंगचा तिसरा दिवस आहे. बायडेन 253 आणि ट्रम्प 214 इलेक्टोरल वोट जिंकले आहेत. चार राज्यांचे निकाल लागणे अद्याप बाकी आहे. यामुळे 'कोण बनणार राष्ट्राध्यक्ष' याचे उत्तर मिळवण्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान, एक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत आहे. कारण ट्रम्प यांनी स्वतः याविषयी इशारा दिला आहे. परिस्थितीही याकडेच इशारा करत आहे. प्रश्न असा आहे की, जर ट्रम्प हारले आणि त्यांनी 'फिजिकली' व्हाइट हाऊस सोडण्यास नकार दिला तर काय होईल?

परंपरा ही आहे...
अमेरिकेमध्ये नेहमी 20 जानेवारीला नवीन राष्ट्राध्यक्ष शपथ घेतो. याला इनॉगरेशन डे म्हटले जाते. याच्या अनेक दिवसांपूर्वीच हरलेला किंवा दोन टर्म पूर्ण केलेला राष्ट्राध्यक्ष (किंवा उमेदवार) व्हाइट हाऊस रिकामे करतो. विजयी झालेल्या उमेदवाराच्या हिशोबाने नंतर हे सजवले जाते.

पहिले बायडेन यांचे उत्तर ऐका
'न्यूयॉर्क पोस्ट' च्या रिपोर्टनुसार, जूनमध्ये बायडेन यांना विचारण्यात आले होते - 'जर हारल्यानंतर ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडण्यास नकार दिला तर? बायडेन यांनी उत्तर दिले' - हो, असे होऊ शकते. मात्र असे झाले तर मिलिट्री त्यांना तेथून बळजबरीने बाहेर काढेल. चेअरमन ऑफ जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ जनरल मार्क मिले म्हणतात की - 'आम्हाला कधीच वाटणार नाही की, मिलिट्रीचा वापर निवडणुकीची प्रकरणे मिटवण्यासाठी केला जावा. जर असे झाले तर कोर्ट्स आणि यूएस काँग्रेस यावर उपाय सुचवतील. यात आर्मीची काय भूमिका?'

पहिले कधीच असे झाले नाही
रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेच्या राजकीय इतिहासात असे कधीच झाले नाही की, हरलेल्या राष्ट्राध्यक्षाने व्हाइट हाउस सोडण्यास नकार दिला असेल. यावेळी ट्रम्प यांच्या कॅरेक्टर आणि वक्तव्यांचा अभ्यास करुन असे पाहिले जात आहे. यामुळे काही शंका आवश्यक आहेत. ट्रम्प अनेक वेळा म्हणाले आहेत की - सत्ता हस्तांतरण किंवा पावर ट्रान्सफरची गरज नसेल, मी व्हाइट हाऊसमध्येच राहिल. याला आता धमकीच्या रुपात पाहिले जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे कायदेशीर प्रकरण आहे. यामध्ये उशीर लागू शकतो. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचू शकते.