आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेत निवडणुकीपूर्वी पहिली डिबेट आेहियोच्या क्लीव्हलँडमध्ये बुधवारी रंगली. त्यात डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार जो. बायडेन व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्परांवर जोरदार निशाणा साधला. त्यातही बायडेन यांनी हंटर, वंशभेद, हवामान बदल, सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत प्रश्न उपस्थित केले. ते ट्रम्प यांना कर प्रणालीवरून घेरतील, असे राजकीय विश्लेषकांना वाटत होते. बायडेन यांनी हा मुद्दा मांडला. परंतु तो तितकासा जोरकस नव्हता. राष्ट्राध्यक्ष विदूषक आहेत. खोटारडे आहेत.त्यांनी काेरोनाबाबत अमेरिकींना खोटी माहिती दिली. त्यांच्याकडे महामारीचा मुकाबला करण्यासाठी काहीही योजना नाही. त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कबाबत गांभीर्य दाखवले नाही, अशी टीका बायडेन यांनी केली. त्यावर ट्रम्प म्हणाले, बायडेन माझ्यापेक्षा उत्कृष्ट काम करू शकत नाहीत. तेच खोटारडे आहेत. ते डेलावेयरला गेले होते. परंतु ते आपल्या कॉलेजचे नाव विसरले. म्हणजे ते डेलावेयरला गेले नव्हते. वास्तविक ते वर्गात पिछाडीवर होते. ४७ वर्षांत त्यांनी काहीही शहाणपणाचे काम केलेले नाही, असा टोला ट्रम्प यांनी लगावला. वादविवादाचे संचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक ख्रिस वालास यांनी केले.
हवामान बदल: ट्रम्प म्हणाले-बाहेर जाणे चांगले, बायडेन म्हणाले, सामील होऊ
ट्रम्प : पॅरिस हवामान बदलविषयक करारातून बाहेर पडण्याचा निर्णय योग्य होता. ही एक आपत्ती आहे. यातून बाहेर पडल्यामुळे लोक आनंदी आहेत. आपल्याकडे सर्वात कमी कार्बन उत्सर्जन होते. व्यवसायाचा बट्ट्याबोळ झाला नाही. बायडेन यांची ग्रीन न्यू डील योजना फसवी आहे.
बायडेन : आम्ही सत्तेवर आल्यास अमेरिका ऐतिहासिक करारात सहभागी होईल. यातून बाहेर पडल्याने आपण एकटे पडत आहोत. ग्रीन न्यू डील माझी योजना नाही. यातून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जाईल. सर्व महामार्गांवर ५ लाख चार्जिंग स्टेशन तयार केले जातील.
वंशवाद : बायडेन- वांशिक द्वेष पसरवणारे ट्रम्प पहिले राष्ट्राध्यक्ष
ट्रम्प : अमेरिकेत वंशभेद नाही. असल्यास दाखवून द्यावे.
बायडेन : प्राऊड बॉइज (प्राऊड बॉइज कट्टरवादी संघटना आहे. परंतु वंशभेद पसरवणारे अशी बदनामी केली जाते.)
ट्रम्प : अमेरिकेत वंशभेद कट्टरवाद्यांमुळे नाही. तो एंटिफासारख्या डाव्या संघटनांमुळे आहे.
बायडेन : ट्रम्प अमेरिकेत वांशिक द्वेष पसरवणारे पहिले राष्ट्राध्यक्ष असून ते यासाठी विशिष्ट समुदायाला भडकवतात.
करचोरी: बायडेन म्हणाले, तुम्ही दोन वर्षांत केवळ ७५० डॉलर दिले, मी भरणार नाही : ट्रम्प
बायडेन : दोन वर्षांत केवळ तुम्ही ७५० डॉलर करभरणा केलाय. हे खरेय ? लोक विचारतात.
ट्रम्प : मी लाखो डॉलरचा कर दिला आहे. करविषयक कायदा सांगतो तेच मी केेले आहे. मी कर देऊ इच्छित नाही. राष्ट्राध्यक्ष होण्याआधी मी एक उद्योगपती होतो.
बायडेन : तुम्ही योग्य पद्धतीने प्रश्नाचे उत्तर दिले नाही. याबाबतीत तुम्ही सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष ठरलात.
जज नियुक्ती : ट्रम्प - हा राष्ट्राध्यक्षाचा अधिकार
ट्रम्प : आम्ही निवडणूक जिंकलो. राष्ट्राध्यक्ष म्हणून मला सुप्रीम कोर्टाच्या जजच्या नियुक्तीचा अधिकार आहे.
बायडेन : सुप्रीम कोर्टाच्या जजच्या नियुक्तीपूर्वी अमेरिकी लोकांना सल्ला देण्याचाही अधिकार आहे.
परिवार: ट्रम्प म्हणाले, बायडेन यांच्या मुलास सैन्यातून काढले
ट्रम्प : बायडेन उपराष्ट्राध्यक्ष होते. तेव्हा त्यांचा मुलगा हंटरने सल्लागारपदी असताना चीनकडून लाखो डॉलर घेतले. ड्रग्जच्या आरोपावरून हंटरला सैन्यातूनही काढले होते.
बायडेन : असे काहीही नाही. अनेक अमेरिकींप्रमाणे हंटरलाही ड्रग्जची समस्या होती. हंटरने त्यावर लक्ष केंद्रित केले. आता हंटर ड्रग्ज घेत नाही. माझा मुलगा बीयू हीरो होता. त्याचा २०१५ मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.