आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत निवडणुकीतील पराभव मान्य केलेला नाही. परंतु नवनिर्वाचित अध्यक्षांकडे सत्तेची सूत्रे साेपवण्याची तयारी मात्र सुरू आहे. ट्रम्प भलेही व्हाइट हाऊस न साेडण्यावर आडून असतील; परंतु अमेरिकेच्या प्रथम महिला तथा ट्रम्प यांची पत्नी मेलानिया यांचा दृष्टिकाेन उलट आहे. नाेव्हेंबरच्या मध्यापासूनच त्या व्हाइट हाऊस साेडण्याची तयारीत आहेत. फ्लाेरिडाच्या मार-ए-लीगाे येथील आलिशान पाम बीचमध्ये शिफ्ट हाेण्याची तयारी करत आहेत.
तेथे मेलानिया एक नवे कार्यालयदेखील सुरू करू शकतात. सीएनएनने मेलानिया यांच्या भावी याेजनेवर आधारित वृत्तांत जारी केला आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी मेलानिया ट्रम्प यांचे एेकताना दिसतात. परंतु हे वास्तव नाही. नाेव्हेंबरमध्ये राज्यातील चित्र स्पष्ट झाले. तेव्हाच मेलानियांनी व्हाइट हाऊस साेडण्याच्या याेजनेवर काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी बजेट व कर्मचारी इत्यादी महत्त्वाच्या गाेष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. मेलानिया यांना आता स्वत:च्या घरात जाण्याची इच्छा आहे, असा दावा त्यांच्या निकटवर्तीयाने सीएनएनशी बाेलताना केला आहे. एप्रिलमध्ये त्यांनी विश्वासू मार्सिया कॅली यांना कर्मचाऱ्यांमध्ये स्थान दिले हाेते. कॅली अनेक बाबतीत मेलानिया यांच्या महत्त्वाच्या सहायक मानल्या जातात. कॅली यांनी आधी व्हाइट हाऊसमध्ये काम केले आहे. त्यांना मेलानियाच्या वेस्ट विंग कार्यालयाबद्दलची माहिती आहे. भविष्यातही त्या मेलानिया यांची मदत करू शकतात. मेलानिया यांना दर महिन्याला २० हजार डाॅलर (सुमारे १४.७५ लाख रुपये) निवृत्तिवेतन मिळेल. कॅली यांनी मेलानिया यांच्या व्हाइट हाऊसमध्ये वैयक्तिक भेटवस्तू, फर्निचर, पेंटिंग्जची यादी तयार केली आहे. सूत्रांच्या मते मेलानियांनी काही सामान आधीच फ्लाेरिडातील पाम बीचला पाठवले आहे. व्हाइट हाऊसमध्ये घालवलेल्या चार वर्षांतील अनुभवावर आधारित एक पुस्तक त्या लिहिण्याची शक्यता आहे. स्मरण स्वरूपात ते तयार केले जाऊ शकते. अलीकडेच माजी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी लेखनप्रपंच केला हाेता. आेबामा यांची पत्नी मिशेल, जाॅर्ज बुश यांची पत्नी लाॅरा बुश यांनीही पुस्तकाचे लेखन केले.
लाखो मते रद्द करण्याची ट्रम्प यांची कोर्टाला विनंती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अजूनही निवडणुकीत बायडेन यांच्याकडून मिळालेल्या पराभवाला पालटण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी एक याचिका देखील दाखल केली आहे. त्यात चार राज्यांतील लाखो मते रद्द केली जावीत, अशी विनंती त्यांनी केली आहे. हा खटला ट्रम्प यांच्याकडून अॅटर्नी जॉन इस्टमॅन लढवणार आहेत. कमला हॅरिस स्थलांतरित असून त्यांना उपराष्ट्राध्यक्ष पद मिळू नये, असा दावा करून याचिका दाखल करणारे इस्टमॅन आधीही चर्चेत आले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.