आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेत जो बायडेन यांनी निर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून भलेही राष्ट्राला संबोधित केले. परंतु, सत्तेचे रहस्य मात्र पुढील काळात वाढत जाणार आहे. निवडणुकीत पराभव होऊनही ट्रम्प यांनी अजून व्हाइट हाऊस सोडलेले नाही. दुसरीकडे काही घटनाक्रम असे आहेत ज्याची माजी सुरक्षा अधिकाऱ्यांना चिंता वाटू लागली आहे. व्हाइट हाऊस सोडण्यापूर्वी ट्रम्प काही गोपनीय सुरक्षाविषयक माहिती ट्रम्प जाहीर करतील किंवा आपल्या व्यापारात लाभ मिळवण्यासाठी विकतील, अशी भीती अधिकाऱ्यांना वाटते.
राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांच्याकडे प्रचंड गोपनीय माहिती आहे. यात आण्विक अस्त्रांचे लाँचिंग, गुप्तचरांची क्षमता, अमेरिकेच्या सामरिक तळांबद्दलची माहिती, अत्याधुनिक शस्त्रप्रणालींच्या विकासाची स्थिती याचा समावेश आहे. या माहितीबाबत आतापर्यंत ट्रम्प बेजबाबदार राहिले आहेत. गुप्तचर संस्था सीआयएचे माजी अधिकारी डेव्हिड प्रिएस यांनी सांगितले, की कोणताही राष्ट्राध्यक्ष नाराज, असंतुष्ट असेल तर अशांबाबत ही जाेखीम असतेच. ट्रम्प यांच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे. यामुळे त्यांच्यावर दबाव असल्याने पराभवानंतर ते विचलित आहेत.
माजी गुप्तचर अधिकारी लॅरी फायफर आणि सीआयएच्या महासंचालक कार्यालयात काम केलेले मायकेल व्ही हेडन म्हणतात, सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांसाठी राष्ट्राध्यक्ष किंवा अन्य उच्च पदावर राहिलेल्या लोकांबाबत, विशेषत: ज्यांच्यावर कर्जाचा डोंगर असतो अशांबाबत ही चिंता नेहमीच असतेच. शिवाय निवडणुकीनंतरचा घटनाक्रम अधिक चिंतेत टाकणारा आहे. व्हाइट सोडण्याची त्यांच्या मनाची अजून तयारी झालेली नाही. त्यांनी पेंटागॉनमध्येही उच्च पदांवर विश्वासूंची वर्णी लावली. संरक्षणमंत्रीही बदलले. ते प्रशासनावर आपली पकड हळूहळू पक्की करत चालले आहेत.
सर्व्हे: 79% अमेरिकींना वाटते ट्रम्पनी पराभव मान्य करावा
ट्रम्प यांनी पराभव स्वीकारावा, असे ७९ टक्के अमेरिकींना वाटते. रॉयटर्स/ इस्पसॉस यांच्या सर्व्हेत लोकांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांनी प्रतिष्ठेने व्हाईट हाऊस सोडायला हवे. तर, १३ टक्के लोकांना वाटते की या निवडणुकीत अजूनही विजय-पराभव निश्चित झालेला नाही. खरा विजय ट्रम्प यांचाच झाला आहे.
ट्रम्प दुसऱ्या कार्यकाळाच्या दिशेने : परराष्ट्रमंत्र्यांचा दावा
ट्रम्प यांनी ‘आम्हीच जिंकू’ असा दावा करून बायडेन ही निवडणूक हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, अमेरिकी परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी ट्रम्प यांचे समर्थन करताना ट्रम्प हळूहळू अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळाकडे वाटचाल करत असल्याचे म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.