आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक खेळी:डोनाल्ड ट्रम्प यांची एच-1 बीसह अनेक व्हिसांवर बंदी, अमेरिकतील अनेक भारतीय कर्मचाऱ्यांची अडचण होणार

न्यूयॉर्क/ नवी दिल्ली / मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेचा भारतीय विद्यार्थी व व्यावसायिकांना धक्का

अमेरिकेने भारतीय विद्यार्थी व व्यावसायिकांना धक्का दिला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रोजगारावर आधारित अनेक अमेरिकी व्हिसा प्रोग्रॅम्सवर तात्पुरती बंदी घातली. त्यांनी एच-१बी व्हिसासह एल-१ व इतर तात्पुरत्या राेजगारांचे व्हिसा स्थगित ठेवण्याचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला. यामुळे अमेरिकतील अनेक भारतीयांची अडचण होणार आहे.

कुणावर काय परिणाम? : विविध अमेरिकी कंपन्यांत येऊ पाहणारे व्यावसायिक लोक ऑक्टोबरमध्ये येऊ शकणार नाहीत. संशोधक विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही. कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय बदल्यांवर परिणाम होईल. ज्यांच्या व्हिसाची मुदत एप्रिलमध्ये संपणार होती त्यांना मुदत वाढवून मिळेल. या नियमातून डॉक्टर, नर्स यांसह विविध सेवा देणाऱ्यांना सूट असेल.

दरम्यान, स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात या घोषणेनुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांनी टाकलेला हा राजकीय डाव असल्याचे मानले जात आहे. यावर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नाराजी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...