आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायडेन यांची उदार वृत्ती...:डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय फिरवला, पाकला 4 वर्षांसाठी 3,600 कोटी रुपये मंजूर

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी पाकिस्तानप्रति उदारपणा दाख‌वला आहे. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय फिरवत पाकिस्तानला एफ-१६ लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी मदत मंजूर केली आहे. ही मदत ४५ कोटी डॉलरची (३६०० कोटी रुपये) आहे. वर्तमान आणि भविष्यात दहशतवादाच्या संकटाशी सामना करण्यासाठी ही आर्थिक मदत दिली जात आहे. गेल्या चार वर्षांत पाकिस्तानला देण्यात आलेली ही सर्वात मोठी सुरक्षा मदत आहे. याआधी, ट्रम्प प्रशासनाने २०१८ मध्ये अतिरेकी संघटना अफगाण तालिबान आणि हक्कानी नेटवर्कवर कारवाई करण्यात अयशस्वी ठरल्याने पाकिस्तानची २ अब्ज डॉलरची (१५,९४० कोटी रुपये) मदत रोखली होती.

बातम्या आणखी आहेत...