आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Donald Trump's Twitter, Facebook And Instagram Account Locked Following Comments On US Capitol Riots

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेच्या संसदेत हिंसा:ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट केले ब्लॉक, नेहमीसाठी बंद करण्याचा इशारा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेसबुकने म्हटले - ट्रम्प यांच्या व्हिडिओने हिंसाचार उसळण्याचा धोका

अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकांच्या निकालापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांमधील हिंसेदरम्यान ट्विटर, फेसबुकने ट्रम्प यांचे अकाउंट ब्लॉक केले आहे. ट्विटरने इशारा दिला आहे की, ट्रम्प यांनी भविष्यात नियम मोडल्यास त्यांचे अकाउंट नेहमीसाठी बंद केले जाऊ शकते.

इंस्टाग्रामनेही ट्रम्प यांचे अकाउंट बंद केले

फेसबुकने म्हटले - ट्रम्प यांच्या व्हिडिओने हिंसा उसळण्याचा धोका
संसदेच्या बिल्डिंगमध्ये हिंसा आणि ट्रम्प यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसंबंधीत 3 ट्विटही हटवण्यात आले आहेत. असे पहिल्यांदाच झाले आहे. यापूर्वी फेसबुक आणि यूट्यूबने ट्रम्प यांचा व्हिडिओ रिमूव्ह केला होता. फेसबुकचे व्हाइस प्रेसिडेंट (इंटेग्रिटी) गुऐ रोजेन यांनी म्हटले की, ही एमरजेंसी आहे.

ट्रम्प यांनी व्हिडिओमध्ये म्हटले होते - निवडणुकीत धोका झाला
कॅपिटल हिलमध्ये हिंसेनंतर ट्रम्प यांनी ट्विटरवर 1 मिनिटाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये ते आपल्या समर्थकांना म्हणत होते - मला माहिती आहे तुम्ही दुःखी आहात. आपल्याकडून निवडणूक हिसकावून घेण्यात आली. यावेळी निवडणुकीत धोका झाला. मात्र आपण त्या लोकांच्या हातात खेळू शकत नाही. आपल्याला शांतता ठेवायची आहे. तुम्ही घरी परता.

बातम्या आणखी आहेत...