आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या जागेसाठी 30 कोटींची देणगी, 15 सदस्यांनी दिला निधी

लंडन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील सर्वात जुनी लाेकशाही असा दावा करणाऱ्या ब्रिटनमध्ये वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्ड्ससचे सदस्यत्व मिळवण्यासाठी देणगी देण्याच्या परंपरेवर शंभर वर्षांपासून बंदी आहे. परंतु अलीकडेच काॅन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडून या सभागृहात सदस्यत्व मिळवणाऱ्या १६ पैकी १५ खासदारांकडून आधी प्रत्येकी ३० काेटी रुपयांची देणगी पक्षाच्या निधीत जमा केली. त्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली हाेती. वास्तविक १९२५ मध्ये वरिष्ठ सभागृहाचे सदस्यत्व मिळावे यासाठी पक्षाला देणगी देण्यास मनाई आहे. जागेच्या बदल्यात रक्कम देणे बेकायदा असल्याचे ब्रिटनच्या कायद्याने घाेषित केले हाेते. १६ पैकी १५ खासदारांना प्रत्येकी ३० काेटी रुपयांपर्यंतची रक्कम पक्ष निधीत जमा करावी लागली. ब्रिटनमध्ये वरिष्ठ सभागृहात प्रवेश मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या या प्रकरणाला वाचा फुटल्याने ते चर्चेत आले आहे. अँड्यू नीलसारख्या पत्रकाराने माेहीम सुरू केली आहे.

लाेकशाहीच्या नावे ब्रिटनमध्ये पैशांचा खेळ सुरू असल्याचा आराेप त्यांनी केला आहे. अजूनही या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी झालेली नाही. गेल्या शंभर वर्षांत ब्रिटनच्या या सभागृहात परिवर्तन आणण्यासाठी अनेक प्रकारची विधेयके आणण्यात आली. परंतु फारसा फरक पडला नाही. १९९९ मध्ये टाेनी ब्लेयर सरकारच्या काळात एकूण ९२ खासदारांनी वरिष्ठ सभागृहाचे सदस्यत्व मिळवले. ते सर्व श्वेत हाेते तसेच ते कुलीन एटन शाळेत शिकले हाेते.

आतापर्यंत देणगीविराेधी कायद्यात ८८ वर्षांपूर्वी एकच खासदार दाेषी
हाऊस आॅफ लाॅर्ड््समध्ये ७८३ सदस्य आहेत. ब्रिटनच्या दाेन्ही सभागृहांतील सदस्यांची संख्या जगातील काेणत्याही देशाच्या संसदेपेक्षा माेठी आहे. ब्रिटनच्या कनिष्ठ सभागृहात देखील खासदारांची संख्या जगाच्या तुलनेत जास्त आहे. वरिष्ठ सभागृहाचे सदस्यत्व मिळवावे यासाठी देणगी किंवा पैशांची मदत प्रकरणात आतापर्यंत केवळ एकाला दाेषी ठरवण्यात आले. ८८ वर्षांपूर्वी मााँडी ग्रेगरी यांच्यावर घाेडेबाजार केल्याचा ठपका होता.

बातम्या आणखी आहेत...