आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सहयोगींना सांगितले आहे की, 20 जानेवारीलाही ते व्हाईट हाऊस सोडणार नाहीत. 20 जानेवारी रोजी प्रेसिडेंट इलेक्ट बायडेन हे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. अमेरिकेत या शपथविधीला पारंपारिकपणे इनॉगरेशन डे असे म्हणतात. असे झाल्यास आणि ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस सोडण्यास नकार दिल्यास देशाला घटनात्मक संकटाचा सामना करावा लागेल. अमेरिकन इतिहासामध्ये याआधी असे कधीच घडले नाही.
हट्टीपणा सुरूच
CNN ने ट्रम्प यांच्या हट्टीपणाविषयी सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांना सांगितले आहे की, उद्घाटनाच्या दिवशीही व्हाइट हाऊस सोडणार नाहीत. त्यांच्या या वृत्तीमुळे त्याची टीमही आश्चर्यचकित आहे. एक अॅडव्हाइजर म्हणाला - आता त्यांना व्हाइट हाऊस सोडावेच लागेल. व्हाइट हाउसने ट्रम्पविषयी आलेल्या या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या पक्षाचे अनेक नेते देखील बायडेन यांच्यासाठी अजूनही प्रेसिडेंट इलेक्ट शब्दाचा वापर करत आहेत.
ट्रम्प प्रत्येक ठिकाणी हरले आहेत
ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेकदा निवडणुकीत घोळ झाल्याचा उल्लेख केला आहे. त्यांच्या प्रचार पथकाने देशातील अनेक न्यायालयात खटलेही दाखल केले आहेत. निवडणूक खटल्याच्या आरोपाखाली सुप्रीम कोर्टाने टेक्सास आणि पेन्सिलवेनिया येथे दाखल केलेल्या दोन अपील रद्द केल्या आहेत. 14 डिसेंबर रोजी इलेक्टोरल कॉलेजच्या मतदानातही ट्रम्प पराभूत झाल्याचे स्पष्ट झाले. 6 जानेवारी रोजी कॉंग्रेस (अमेरिकन संसदेची दोन्ही सभागृहे) त्यावर औपचारिक शिक्कामोर्तब करतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.