आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Don't Exercise Too Much, So The Risk Of Serious Heart Problems Doubles, People Under The Age Of 55 Are More Affected: Study; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:खूप व्यायाम करू नका, त्यामुळे हृदयाशी संबंधित गंभीर समस्यांची जोखीम होते दुप्पट, 55 वर्षांखालील लोकांवर होतो जास्त परिणाम : अभ्यास

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनच्या संशोधकांनी 70 हजार लोकांच्या हृदयाच्या अभ्यासातून काढला निष्कर्ष

अलीकडेच युरो कपच्या सामन्यात डेन्मार्कचा फुटबॉलपटू क्रिश्चियन एरिक्सनला हार्ट अटॅक आला होता. आणखी एका खेळाडूला हार्ट स्टार्टिंग डिव्हाइस लावावे लागले होते. खूप व्यायाम केल्यास आरोग्य चांगले राहील असा समज असणाऱ्यांत तुम्हीही असाल तर सावधान. संशोधकांच्या दाव्यानुसार, सामान्यपेक्षा जास्त व्यायाम केल्यास हृदयाशी संबंधित गंभीर समस्यांचा धोका दुपटीपर्यंत वाढतो. ७० हजार लोकांच्या हृदयाच्या आरोग्याचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी हा दावा केला आहे. त्यात ६३ हजार सामान्य लोक, तर इतर अॅथलीट किंवा क्रीडा स्पर्धांत भाग घेणारे होते.

ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित या अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, सामान्य लोकांच्या तुलनेत खेळाडूंना अॅट्रियल फिब्रिलेशनची (हृदयाची स्पंदने अनियमित होणे) समस्या होण्याची शक्यता २.५ पट जास्त असते. ही स्थिती स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअरचे कारण ठरते. संशोधकांना असेही आढळले की, ५५ वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या खेळाडूंना हा धोका आणखी जास्त आहे, कारण सामान्य लोकांच्या तुलनेत त्यांना अॅट्रियल फिब्रिलेशनची जोखीम ३.६ पट जास्त आहे. ही समस्या बहुतांश वृद्ध लोकांत आढळत होती, पण आता युवकांमध्येही ती वेगाने वाढत आहे.

आठवड्यात पाच दिवस ४० मिनिटांचा व्यायाम उत्तम
एका निरोगी प्रौढ व्यक्तीने रोज ५ किमी चालावे. आठवड्यात ५ दिवस ४० मिनिटे व्यायाम करू शकता. व्यायामानंतर कमाल हार्ट रेट ६० % असावा. हार्ट रेट २२० मधून वय घटवून मोजू शकता. म्हणजे एखाद्याचे वय ३० वर्षे असेल तर व्यायामानंतर त्याचा हार्ट रेट २२०-३०=१९० च्या ६०% म्हणजे ११४ असावा. ८५% पर्यंत हार्ट रेट असेल तरी काही अडचण नाही आणि ईसीजीत बदलही दिसला नाही तर हृदय निरोगी आहे. - प्रा.संदीप मिश्रा, हार्ट स्पेशालिस्ट, एम्स, दिल्ली

निश्चित मर्यादेपर्यंत व्यायाम केल्यास उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाचा धोका कमी
अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि कँटरबरी क्राइस्टचर्च विद्यापीठातील तज्ञ डॉ. जेमी ऑड्रिस्कॉल म्हणाले, हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी निश्चित मर्यादेपर्यंतच व्यायाम करणे चांगले आहे, हे अभ्यासावरून स्पष्ट होते. समग्र रूपातील शारीरिक हालचाली हृदयाच्या आरोग्यात सुधारणा करतात. तसेच उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि हाय कोलेस्टेरॉलचा धोका कमी करतात. त्यामुळे हृदयाच्या समस्यांमुळे मृत्यूच्या शक्यतेतही बऱ्याच मर्यादेपर्यंत घट होते.

बातम्या आणखी आहेत...