आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपिनेस:आशा सोडू नका, मुलांसारखा आनंदाचा विचार करा, प्रकृती आणि मूडही राहील

न्यूयॉर्क9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेच्या सहलीआधीच लहान मूल त्याबद्दलची कल्पना करू लागते. म्हणजे पिकनिकमध्ये कोणकोणते खेळ घेतले जातील? खाण्यासाठी कायम मिळेल? परंतु अशा कल्पना करण्याची सवय वाढत्या वयासोबत कमी होते. म्हणूनच जीवनात आशा बाळगली पाहिजे. लहानसहान गोष्टींमुळे आनंद होणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. छोट्या-छोट्या गोष्टींबद्दलची उत्सुकता तुमच्यातील तणाव दूर करण्यास मदत करू शकते. मूड अधिक चांगला करण्यास मदत करू शकते. विविध प्रकारच्या अभ्यासातून त्यास पुष्टी मिळाली आहे. माँटेफियोर मेडिकल सेंटरचे मुख्य मानसतज्ज्ञ सिमोन ए. रेगो म्हणाले, लहानसहान आनंदाचे विचार वर्तमानात चांगले अनुभव देतात. यातून प्रेरणा, आशा व धैर्य वाढू लागते. जीवनाचा जास्तीत जास्त आनंद घ्यायचा झाल्यास जीवनात पुढील काळाबद्दल आधीच विचार करावा. त्याबद्दल कल्पना करा. स्वत:लाच भविष्यातील चांगल्या गोष्टींचे चित्र दाखवून पाहा.

निराश मुळीच होऊ नका
नवीन सुरुवात करताना चिंता आणि उत्सुकतेचे भाव येऊ लागतात. स्वत:ला नवीन वातावरणानुसार तयार करा. उत्सुकतेवर चिंतेने मात केल्यास ते आरोग्यासाठी हितकारक नसते. म्हणूनच कदापि निराश होऊ नका. उत्साह कायम ठेवा. यातूनच काहीतरी चांगले घडण्याची शक्यता असते.

बातम्या आणखी आहेत...