आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:आता अमेरिका आत्मनिर्भर होणार, परदेशातून औषधी मागवू नका! निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांची नवी खेळी

वाॅशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताच्या 40 हजार काेटी औषध निर्यातीवर परिणाम शक्य

औषधी तसेच चिकित्सेसंदर्भात अमेरिका चीन तसेच इतर देशांवर अवलंबून आहे. हे अवलंबित्व आता संपुष्टात आणले जाणार आहे. म्हणूनच यापुढे अमेरिकी कंपन्यांकडूनच औषधींची खरेदी करावी, असे आदेश राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी काढले आहेत. काेराेनाच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी चीनवर हल्ला करताना नवा झटका दिला.

काेराेनाबद्दलची वस्तुनिष्ठ माहिती लपवण्याचे काम चीनने केल्याचा आराेप ट्रम्प तसेच अनेक देशांच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे जगभरातील लाेक माेठ्या संख्येने प्राणास मुकले. त्याचबराेबर आर्थिक संकटही काेसळले. महत्त्वाच्या औषधी परदेशी कंपन्यांएेवजी अमेरिकी उत्पादकांकडून खरेदी करण्याचे निर्देश समाविष्ट असलेल्या प्रस्तावावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. दुसरीकडे आेहिआेमध्ये एका कंपनी प्रकल्पाच्या दाैऱ्यानंतर ट्रम्प यांनी कामगारांशी चर्चा केली. आधीचे आेबामा-बायडेन प्रशासन चीनच्या विजयासाठी पूर्ण खुश हाेते. आगामी चार वर्षांत आपण औषधी व चिकित्सा उपकरणांच्या उत्पादनाची साखळी निर्माण करू. त्यामुळे चीन तसेच इतर देशांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. नाेकऱ्या तसेच कारखानदारी देशात वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन याप्रसंगी त्यांनी दिले.

कडक भूमिका : यादीतील चिनी कंपन्यांवर कडक कारवाईची तयारी
अमेरिकेतील यादीत समाविष्ट चिनी कंपन्यांवर कडक कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनाचा विचाराधीन आहे. अमेरिकेत नाेंदणी असलेल्या व अमेरिकेच्या नियमांचे पालन करत नसलेल्या कंपन्यांवर कारवाई केली जाऊ शकते. स्ट्रीट जर्नलच्या म्हणण्यानुसार न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज, नॅसडॅकसारख्या अमेरिकी शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांना ऑडिटबाबत अमेरिकेतील नियमांचे पालन करावे लागेल. सध्या तरी चिनी कंपन्या सूचिबद्ध नाहीत, परंतु आयपीआेबाबत एक याेजना तयार करत आहे.

कारवाई : टिकटाॅक-व्हीचॅट बाडबिस्तरा गुंडाळणार, आदेशावर केली स्वाक्षरी
ट्रम्प यांनी चीनचे अॅप टिकटाॅक व व्हीचॅटच्या मालकांसाेबत काेणत्याही स्वरूपातील देवाण-घेवाणीच्या व्यवहारावर बंदी घातली आहे. त्याशिवाय टिकटाॅकवर बंदी लागू करण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत निश्चित केली आहे. ४५ दिवसांत दाेन्ही अॅप बंद करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. तत्पूर्वी सिनेटने एकमताने अमेरिकी कर्मचाऱ्यांना टिकटाॅकचा वापर करू नये, असे बजावले हाेते. बंदीच्या आदेशावरील स्वाक्षरीनंतर ट्रम्प म्हणाले, या अॅपमुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे.

भारताच्या ४० हजार काेटी औषध निर्यातीवर परिणाम शक्य
चीन व अमेरिकेच्या संघर्षाचा फटका भारताला बसू शकताे. कारण भारत अमेरिकेला माेठ्या प्रमाणात औषधी निर्यात करत आला आहे. भारत एकूण निर्यातीपैकी २८ टक्के अमेरिकेला निर्यात करताे. भारताचा औषधी उत्पादने व निर्यातीच्या क्षेत्रात अव्वल देशांच्या यादीत समावेश हाेताे. देशातून दरवर्षी सुमारे दीड लाख काेटी रुपयांची औषधी वेगवेगळ्या देशांत निर्यात केली जाते. त्यात ४० ते ४२ हजार काेटी रुपयांची औषधी अमेरिकेला पाठवली जाते. अमेरिका देशातच आैषधीची निर्मिती करू लागल्यास भारताच्या औषधी उद्याेगावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मुख्यत्वे अमेरिकेला निर्यात करणाऱ्या औषधी कंपन्यांचे त्यामुळे जास्त नुकसान हाेऊ शकते. त्याचबराेबर अमेरिकेतच बाजारपेठ तयार केलेल्या निर्यातदारांसाठीदेखील हा निर्णय अडचणीत आणणारा ठरणार आहे. त्यांना आगामी काळात नवी बाजारपेठ शाेधावी लागेल. ३० दिवसांत अत्यावश्यक औषधींची यादी जाहीर होईल.

बातम्या आणखी आहेत...