आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:गरीब देशांत 4 % लोकांना डोस; 3 भारतीय कंपन्या बनवणार लस, इतर विकसनशील देशांचीही तयारी सुरू

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात लसीकरण माेहिमेबाबत काही प्रश्न निर्माण झाले आहेत. सगळ्या देशांत लसीचे समान असे वितरण करण्यात आलेले नाही. जगभरातील गरीब देशांत चार टक्के लाेकसंख्येला दाेन डाेस मिळाले आहेत. विविध देशांची संघटना काेवॅक्सद्वारे सर्वांना लस उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार एमआरएनए लसीच्या तंत्रज्ञानाला हस्तांतरित करणे अपेक्षित हाेते. श्रीमंत देशांत आरएनए आधारित लसीचे माेठे प्रकल्प आहेत. परंतु श्रीमंत देशांच्या कंपन्या उदाहरणार्थ फायझर-माॅडर्ना हे तंत्रज्ञान देण्यास टाळाटाळ करू लागल्या आहेत. जगातील पाच देशांतील दहा कंपन्या आरएनए लसीची निर्मिती करून हा भेदभाव नष्ट करतील. या दहा कंपन्यांमध्ये तीन भारतीय आहेत. या कंपन्यांकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. लवकरच या कंपन्या एमआरएनए आधारित लसींची निर्मिती करून जगभरात लसींच्या वितरणात झालेले असंतुलन दूर करतील. इतर विकसनशील देशांपैकी इंडाेनेशिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील व अर्जेंटिनामध्ये एमआरएनएवर आधारित लसींच्या निर्मितीचे तंत्रज्ञान आहे.

सात लस कंपन्यांच्या प्रतिनिधींशी पंतप्रधानांची चर्चा
नवी दिल्ली : देशात १०० काेटी लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शनिवारी देशातील सात प्रमुख लस निर्मात्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची चर्चा केली. यात सिरम इन्स्टिट्यूट, भारत बायाेटेक, डाॅ. रेड्डीज लॅब, जाइडस कॅडिला, बायाेलाॅजिक, जिनाेमा बायाेफार्मा इत्यादी कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश हाेता.

सिरम इन्स्टिट्युट : जगातील सर्वात माेठी लस निर्माती कंपनी. सध्या आॅक्सफर्ड अॅस्ट्राजेनेका व नाेवावॅक्ससाठी लसीची निर्मिती. एमआरएनए लसीमध्ये गुंतवणूक करत आहे.
स्काेअर कार्ड : उत्पादन अनुभव : उत्कृष्ट, मनुष्यबळ विकास : उत्कृष्ट, पर्यावरण-सुरक्षा : उत्कृष्ट.
बायाेलाॅजिक ई : हैदराबादच्या या कंपनीच्या प्राेटीन आधारित लसीचे तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण सुरू आहे. एका महिन्यात एक काेटी एमआरएनए लस निर्मितीची क्षमता.
जेनाेव्हा : कंपनी एमआरएनए लसीचे दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण करत आहे.

बातम्या आणखी आहेत...