आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज जागतिक कुटुंब दिन:संपूर्ण कुटुंब डॉक्टर, अमेरिकेतून भारतीयांना देतात वैद्यकीय सल्ला; कुटुंबातूनच सर्वांना मिळाली आहे गरजूंची सेवा करण्याची शिकवण

वाॅशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना महामारीसोबतच्या युद्धात वैद्यकीय सल्ला देणाऱ्या डॉक्टर कुटुंबाची कहाणी

अमेरिकेच्या इंडियानापोलिस राज्यात राहणाऱ्या डॉ. डॉली राणी पेशाने एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत. सध्या त्या चोवीस तास व्हिडिओ चॅट्स, फोन कॉल्स आणि व्हॉट्सअॅपवर वैद्यकीय सल्ला देताना दिसतात. त्यांचा बहुतांश वेळ भारतीय लोकांना मदत करण्यात व्यतीत होत आहे. त्यांच्या ‘मिनी टेलिमेडिसिन’ च्या प्रयत्नामुळेच गेल्या एक महिन्यातच भारतातील शेकडो रुग्णांना लाभ मिळाला आहे. त्यांच्या कुटुंबात १० सदस्य असून सर्व जण डॉक्टर आहेत. तेही त्यांना संपूर्ण मदत करत आहेत. डॉ. डॉली भारतातून येणाऱ्या प्रत्येक फोन कॉल किंवा मेसेजला उत्तर देतात. कोणती लक्षणे आढळतात, रुग्णालयात केव्हा जायचे, रुग्णाला ऑक्सिजनची गरज केव्हा भासू शकते आणि त्यांना अँटिबायोटिक किंवा स्टेरॉइड केव्हा सुरू करायला हवे, हे त्या सांगतात. त्या म्हणाल्या,‘रुग्णांना दिलासा देणे आणि जगण्याची उमेद हरवू नये यासाठी प्रेरित करणे हे सर्वात कठीण काम आहे.’ त्या सर्वांना हेच सांगतात,‘ ही लढाईची वेळ आहे.

सेवाभाव कुटुंबातूनच निर्माण होतो, त्यामुळे स्वकीयांना एकाकी सोडता येत नाही. हिंमत ठेवा. तुम्ही लवकरच बरे व्हाल.’ डॉ. डॉली म्हणाल्या,‘ अनेक बातम्या विचलित करतात. व्हॉट्सअॅप उघडताना आज काय बातमी मिळेल याची भीती वाटते. पण हा युद्धकाळ आहे. दिल्लीत माझी बहीण डॉ. डेझी राणी आणि आमची संपूर्ण बॅच सर्व गरजूंना शक्य ती सर्व मदत करत आहे. आम्ही इंडियानापोलिस प्रशासन आणि मेडिकल असोसिएशनच्या मदतीने ६०० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरही भारतात पाठवले आहेत.’ डॉ. डेझी यांनी सांगितले,‘ आमच्यावर कामाचा निश्चितच दबाव आहे, पण आप्तांना गमवावे लागते तेव्हा खूप वाईट वाटते. पण काय करावे? इतरांचे जीव वाचवण्यासाठी कामावर जावे लागतेच.’

डाॅ. डॉली यांनी सांगितले की,‘सध्या भारतातून सर्वाधिक फोन येत आहेत. त्यांची वेळही निश्चित नसते. मध्यरात्रीही मी फोनवर लोकांचे म्हणणे नीट ऐकून घेऊन सल्ला देते. महिनाभरापासून आईशी बोलले नाही, तेव्हा मातृदिनी तिचाच फोन आला. तू जे काम करत आहेस ते सोडू नको. आज तुझी सर्वांना गरज आहे, असे आईनेच मला सांगितले. आपत्कालीन गरज असणाऱ्यांना मी माझ्या भारतात राहणाऱ्या नातेवाइकांकडून मदत घेण्याचा सल्ला देते.’

बातम्या आणखी आहेत...