आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकमीत कमी वर्षभर जगात सर्वांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे लागेल आणि मास्क तर आयुष्याचा भाग करावा लागेल. हा विषाणू श्वासातून प्रवेश करतो यामुळे हवा शुद्ध करत राहावी लागेल. लस ठीक आहे, मात्र विषाणूही नवे रूप धारण करत आहे. यामुळे सावध राहण्याची गरज आहे. लसीकरणानंतर दरवर्षी बूस्टर घ्यावा लागेल तेव्हाच संरक्षण होऊ शकेल. कोरोनावर विजय मिळवण्यात दोन वर्षे लागतील. यानंतरही आपल्याला आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवावी लागेल, म्हणजे नव्या आजारांशी लढता येईल.
इन्फ्लूएंझा विषाणूमुळे अशा आजारांचा आपल्याला सामना करावा लागेल. १९१८ मध्ये स्पॅनिश फ्लूमुळे २ कोटी मृत्यू झाले होते. ते इन्फ्लूएंझा विषाणूचे एक उदाहरण आहे. आपल्यावर विषाणूचा हल्ला कधीही होऊ शकतो. विषाणू नेहमीच पक्षी वा प्राण्यांमध्ये आढळतो. प्राण्यांची खरेदी- विक्री होते त्या बाजारांमध्ये काळजी घ्यावी लागेल. वुहानमध्ये कोरोनाचा प्रसार असाच झाला होता. एक मोठा धोका वातावरण बदलही आहे. पर्माफ्रॉस्ट घटल्याने बर्फाखाली जमिनीत गाडलेले कोट्यवधी विषाणू सक्रिय होतील. मी अजूनही जिवंत विषाणू जास्त धोकादायक समजतो, मात्र आपल्याला वातावरण बदलाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यावर लवकर तोडगा काढावा लागेल. यात विज्ञानाची मदत घ्यावी लागेल. जर विज्ञान मान्य केले नाही तर मग आपल्याला आजार व विनाशासाठी तयार राहावे लागेल.
कोरोनाने जगाला अनेक धडे शिकवले आहेत. पहिला धडा- विषाणू वास्तवता आहे व खूप धोकादायक हाेऊ शकतो. म्हणून आपल्याला निसर्ग आणि आपल्या आरोग्याबाबत सावध राहायची गरज आहे. तसेच विषाणू संशोधनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. म्हणून या क्षेत्रात श्रम व पैशाची सतत गुंतवणूक करावी लागेल. जेव्हाही महामारी येईल तेव्हा आपल्याला लस तयार करावी तर लागेलच. तिचा साठाही करावा लागेल. सार्स २००३ मध्ये पसरला होता. लस तयार करण्याची प्रक्रियाही खूप पुढे गेली आहे. मात्र, महामारी लवकर नष्ट व्हावी यासाठी लसीवर काम मध्येच सोडून देण्यात आले. आपण लसींचा साठा केला असता तर कोरोनाशी लढणे सोपे झाले असते. सर्वात मोठा धडा- हा आहे की, देशाला लस तयार करण्याचे कसब प्राप्त करावे लागेल. तसेही आयुष्य आहे तोपर्यंत धोका आहेच. अनुभवातून शिकत राहिलो तर धोक्यांना तोंड देता येईल. तसेच असे खेळ खेळावेत, ज्यात मास्क घालणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन शक्य व्हावे. असे खेळ बघून मानसिक तणाव दूर होतो आणि खेळल्यास शरीरही तंदुरुस्त राहील.
वातावरण बदल मोठा धोका, अनेक वर्षे दबलेले विषाणू पुन्हा जिवंत होऊ शकतात
लस तयार करण्याबरोबरच त्यांचा साठाही करावा लागेल.कोरोना विषाणू नवे रूप धारण करत आहे. यामुळे सावधानता आवश्यक आहे. सर्वात आधी तर सर्वांना लस घ्यावी लागेल. यानंतर दरवर्षी बूस्टर द्यावा लागेल, तेव्हाच विषाणूपासून संरक्षण होईल. २०२० मध्ये वैद्यकीय क्षेत्राचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ. मायकेल ह्यूटन यांचे म्हणणे आहे की, यानंतरही आपल्याला रोगप्रतिकारशक्ती मजबूत करावी लागेल. कारण, आपल्याला माहिती नाही की, पुढचा विषाणू कोणत्या प्रकारचा आणि किती शक्तिशाली असेल. त्यांच्यासोबत रितेश शुक्ल यांनी विशेष बातचीत केली. वाचा मुख्य अंश...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.