आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Dr. Of Family Global Research. Vice's Opinion .. Children Who Grow Up In A Family Where Parents Respect Each Other Are Successful In Life

आज कुटुंब दिन:फॅमिली ग्लोबल रिसर्चच्या डॉ. व्हाइस यांचे मत.. आई-वडील परस्परांचा सन्मान करणाऱ्या कुटुंबात वाढणारी मुले जीवनात यशस्वी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्तमानाच्या कुशीत असलेला भविष्यकाळ आणि संस्काराच्या रूपातील इतिहासाचे वर्तमान म्हणजे कुटुंब. हीच या जगाची कधीही न संपणारी कहाणी असावी. ही कहाणी आई-वडिलांपासून सुरू होते. पण जगभरात तिचे अस्तित्व दिसते. आपत्ती आणि युद्धाची स्थिती असतानाही जगाला वाचवणारी एकमेव संस्था म्हणजे कुटुंब संस्था होय. ग्लोबल फॅमिली रिसर्च प्रोजेक्टच्या संस्थापक व हार्वर्ड फॅमिली रिसर्च प्रोजेक्टच्या माजी कार्यकारी संचालक डॉ. हेदर व्हाइस म्हणाल्या, सामवेदाच्या महोपनिषदमध्ये “वसुधैव कुटुंबकम्’चा उल्लेख आहे.

भारत आजही हे तत्त्वज्ञान जगतो. ब्रुकिंग्ज च्या सेंटर फॉर युनिव्हर्सल एज्युकेशनसह जानेवारी २०२१ मध्ये भारतासह दहा देशांतील २५ हजार कुटुंबांची पाहणी करण्यात आली. मुलांच्या शिक्षणातून कोणती अपेक्षा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. भारत वगळता इतर देशांनी मुलांना स्वत:च्या उद्देशाची आेळख व्हावी असे शिक्षण मिळावे, असे मत व्यक्त केले. भारतातील बहुतांश कुटुंबांनी मात्र मूल चांगला माणूस व्हावे, असे म्हटले. भारतीय संस्कार हीच कुटुंबाची खरी आेळख आहे. कोरोनाच्या काळात भारताने अनेक देशांना मदत दिली. महामारीच्या काळात जगाने कुटुंबाच्या परिभाषेला जागृत होताना पाहिले. पश्चिमेकडील देशातही मुलांनी आजी-आजोबा यांच्यासह कुटुंबातील अनुभव जगले. कुटुंब हीच शाळा,खेळाचे मैदानही असल्याची जाणीव या काळात झाली. भास्करचे रितेश शुक्ल यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित.

कुटुंबात मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास
डॉ. व्हाइस म्हणाल्या, मुले प्रसन्न राहिली तरच कुटुंब आनंदी राहू शकेल. आई-वडिलांनी परस्परांचा सन्मान केला तरच पुढे अशा कुटुंबातील मुले निश्चितपणे जीवनात यशस्वी होतील. मुलांना यशस्वी करणे हेच कुटुंबाचे पहिले कर्तव्य ठरते.

बातम्या आणखी आहेत...