आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेला पिछाडीवर टाकून नाैदलात चीन जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनले आहे. सध्या चीनच्या नाैदलाकडे असलेल्या युद्धनाैका व पाणबुड्यांची संख्या पाहता तेवढे अमेरिकेच्या ताफ्यात नाहीत. एवढी शस्त्रे असूनही चीनची फायर पाॅवर व युद्धक्षमता जगातील अनेक देशांपेक्षा खूप कमी आहे हे तितकेच खरे आहे. एका अमेरिकी मीडियाच्या हवाल्यानुसार चीनचे सर्वात शक्तिशाली नेते व राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी देशाच्या नाैदलास जगातील सर्वात शक्तिशाली बनवण्याचा संकल्प केला हाेता. २०१८ मध्ये जिनपिंग यांनी दक्षिण चिनी सागरात सामरिक शक्तीचे प्रदर्शन मांडले.
या युद्धसरावात एका वेळी ४८ युद्धनाैका, डझनावर लढाऊ विमाने आणि १० हजारांहून जास्त नाैदल सैनिक सहभागी हाेेते. माआे त्से तुंग यांच्यानंतर चीनचे दुसरे शक्तिशाली नेते बनलेले शी जिनपिंग चिनी नाैदलाला प्रचंड ताकद देत आहेत. त्यातून जगातील सात समुद्रांत चीनची महानता व शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. २०२० पर्यंत समुद्रात चीनने ३६० हून जास्त युद्धनाैका तैनात केल्या आहेत. त्यामुळे चीन समुद्रात सर्वात शक्तिशाली बनला आहे, असे अमेरिकेच्या नाैदल गुप्तचर यंत्रणेला वाटते. अमेरिकी नाैदलाचे स्पष्टीकरण जगासाठी धाेक्याची घंटा आहे. कारण, चीन संरक्षणावर प्रचंड खर्च करू लागला आहे. चीनचे विस्तारवादी धाेरण आगामी काळात जगाला युद्धाच्या खाईत लाेटणारे ठरण्याची भीती आहे. २०१५ मध्ये चिनी नाैदलाने आपली ताकद अमेरिकी नाैदलाच्या बराेबरीने करण्यासाठी व्यापक माेहीम सुरू केली हाेती.
अमेरिकेची अडचण : चीनची सर्वात माेठी ताकद त्याचे तटरक्षक दल व लष्कर आहे. हे सैनिक आजूबाजूच्या समुद्रात माेठ्या संख्येने लहान-लहान गटाने गस्त करतात. चिनी सैन्याचे घुसखाेर इतर देशांच्या सागरी क्षेत्रात घुसून मासे पकडणे व सागरी संशाेधनाचे दुहेरी काम करतात. ही संख्या चिनी नाैदलात समाविष्ट केल्यास ती दुप्पट हाेते. म्हणूूनच काेराेनाचा फटका बसलेली अमेरिका बजेट व साधनांच्या तुटवड्याच्या समस्येला ताेंड देत आहे.भारतीय नाैदल जगातील सर्वात शक्तिशाली सातव्या क्रमांकाचे नाैदल आहे. आपल्याकडे ७० हजार नाैदल जवानांसह विनाशिका, फ्रिगेट, युद्धनाैका, पहारा देणारी जहाजे, आण्विक पाणबुड्यांसह इतर पाणबुड्या, युद्धनाैका, पेट्राेल व तटरक्षक जहाज, विमानवाहू नाैकाही आहेत. भारताची पहिली आण्विक स्वदेशी पाणबुडी आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.