आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या लसीवर संशय:दोन डोस घेतलेल्यांना आता जर्मन बूस्टर डोस घेण्याची वेळ, संसर्ग वाढीनंतर निर्णय

बीजिंगएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चीन लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना बूस्टर डोस देण्याच्या तयारीला लागला आहे. चीनच्या फोसून फार्मा व जर्मनीच्या बायोएनटेकद्वारे विकसित एमआरएनए लसीचा बूस्टर डोस चिनी लस घेतलेल्यांना दिला जाणार आहे. चीनच्या बहुतांश नागरिकांना सिनोवॅक व सिनोफार्मचे डोस देण्यात आले आहेत. या दोन्ही लसींत नवीन एमआरएनए तंत्रज्ञानाऐवजी विषाणूच्या निष्क्रिय कणांचा वापर करण्यात आला आहे. आता कॉमिरनाटी नावाच्या लसीला बूस्टर डोस म्हणून वापर करण्याचा विचार चिनी अधिकारी करत आहेत. परंतु फोसूनकडे चीनमध्ये लस निर्मिती व वितरणाचा विशेष अधिकार आहे. बायोएनटेकची लस सद्य:स्थितीत चिनी सरकारच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. ही लस ९५ टक्के प्रभावी मानली जाते. आतापर्यंत चीनने १४० कोटी लोकांचे लसीकरण केले.

नवे संकट : मंकी बी विषाणू संसर्गाने पशुचिकित्सकाचा मृत्यू
कोरोना महामारीदरम्यान चीनमध्ये मंकी बी विषाणू संसर्गामुळे एका पशुचिकित्सकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ग्लोबल टाइम्सनुसार ५३ वर्षीय पशुचिकित्सक राजधानी बीजिंगचे रहिवासी होते. त्यांच्या नातेवाइकांना अद्याप काही धोका झालेला नाही. त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे. मार्चमध्ये त्यांनी दोन मृत वानरांची शस्त्रक्रिया केली होती.

संसर्ग वाढीनंतर निर्णय
मंगोलिया, सेशेल्स, बहारीन इत्यादी देेशांत चीनची लस घेण्यात आली होती. परंतु तेथे महामारीचा सामना करताना आता संसर्ग आणखी वाढला आहे. चीनची लस विषाणूच्या विरोधात ५० ते ८० टक्क्यांपर्यंत काम करते. मॉडर्ना, फायझर-बायोएनटेकद्वारे विकसित एमआरएनए लसींच्या तुलनेत त्या कमी प्रभावी ठरतात.

बातम्या आणखी आहेत...