आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात सर्वाधिक लोक कोणती नोकरी करू इच्छितात, असा प्रश्न तुमच्या मनात असल्यास त्याचे उत्तर आहे - वैमानिक. भारतातील सर्वाधिक लोकांना मात्र लेखक होण्याची इच्छा आहे. तसे पाहिल्यास जगभर लोकप्रियतेच्या बाबत लेखक पेशा दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रवाशांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणाऱ्या रेमिटली कंपनीने गुगलवर गेल्या बारा महिन्यांतील जॉब सर्चचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे. रेमिटलीने २०० प्रकारच्या जॉब सर्चच्या आकड्यांचे विश्लेषण केले. त्यात अमेरिका, कॅनडा, ब्रिटन व ऑस्ट्रेलियासह २५ देशांत ९,३०,६३० सर्चसह ‘पायलट कसे होता येईल?’ पहिल्या स्थानी राहिले. रायटरचा जॉब ८,०१,२०० सर्चसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात रंजक म्हणजे भारतासोबतच न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसह ७५ देशांत नोकरीसाठी सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या शब्दांत हे आघाडीवर आहे. चांगले वेतन, नोकरीच्या जास्तीत जास्त संधी व प्रवासाच्या संधीमुळे वैमानिक सर्वाधिक पसंतीचे ठरल्याचे अहवालात म्हटले आहे.
चीनमध्ये ‘डाएटिशियन’ ड्रीम जॉब...
{आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये चीनमध्ये सर्वाधिक लोकांना डाएटिशियन होण्याची इच्छा आहे. जर्मनीत प्रोफेसर व जपानमध्ये युट्यूबर सर्वाधिक पसंतीचे.
{शेजारी देशांमध्ये पाकिस्तान, भूतान, बांगलादेशमध्ये लेखकाचा व्यवसाय पहिल्या स्थानी आहे.
{सौदीमध्ये सर्वाधिक लोकांना कवी व्हायचे आहे. याशिवाय इजिप्तमध्ये फुटबॉल कोच हाेण्याला पसंती अाहे.
ट्रेंड : शिक्षक-डॉक्टरपेक्षा जास्त जणांना डान्सर, यूट्यूबर व्हायचेय
व्यवसाय गुगल सर्च
पायलट 9,30,630
लेखक 8,01,200
डान्सर 2,78,720
यूट्यूबर 1,95,070
आंत्रप्रेन्योर 1,78,380
अभिनेता 1,76,180
एन्फ्लुएन्सर 1,59,180
प्रोग्रामर 1,25,310
गायक 1,21,430
शिक्षक 1,14,950
व्यवसाय गुगल सर्च
डीजे 1,12,360
ब्लॉगर 1,04,600
डॉक्टर 1,04,080
प्रोफेसर 91,400
फ्ला.अटेंडंट 88,240
फा. फायटर 84,300
न्यायाधीश 83,800
वकील 79,470
अॅटर्नी 74,030
मानसतज्ज्ञ 66,750
वास्तव्यासाठी जगभरात कॅनडा सर्वाधिक पसंतीचा देश
{सर्वाधिक ३० देशांतील लोक कॅनडात वास्तव्य करू इच्छितात. जपानसाठी १३, स्पेनसाठी १२, जर्मनीसाठी ८, कतारसाठी ६, ऑस्ट्रेलियासाठी ५, स्वित्झर्लंडसाठी ४ देशांतून सर्वाधिक सर्च. {भारत-पाकिस्तानमधूनही सर्वाधिक लोक कॅनडात स्थलांतरित होऊ इच्छितात. कॅनडा व अमेरिकेतील लोक जपान तर रशिया-नॉर्वेतील नागरिक अमेरिकेत वास्तव्य करू इच्छितात.
शिक्षणासाठी लोकप्रिय देशांत भारत ७ व्या स्थानी
{३६ देशांतील नागरिक कॅनडात शिक्षणासाठी सर्च करतात. टॉप-२५० विद्यापीठापैकी दहा कॅनडातील आहेत. स्पेनसाठी १३ देशांतून सर्च झाले. हे दुसऱ्या स्थानी आहे.
{भारतात शिक्षणासाठी ६ देशांतून सर्च झाले. रशियापेक्षा (३) हे प्रमाण दुप्पट आहे. यादीत भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.