आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॅनडात जूनमध्ये प्रचंड तापमान व जंगलातील वणव्यासारख्या संकटाचा सामना करावा लागत हाेता. आता देशातील अनेक भागांत दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबांवर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गाेवंशासाठी चाऱ्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पाळीव जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेकडाेंच्या संख्येत गायी-बैल घेऊन शेतकरी बाजार गाठू लागले आहेत. कारण त्यांना विकून तरी किमान कुटुंबांचे आर्थिक संकट दूर हाेऊ शकेल, असे त्यांना वाटते. भीषण तापमानामुळे मॅनिटाेबा व इतर राज्यांतील जंगलांत वणवा पेटला हाेता. त्यामुळे गवताळ प्रदेश नामशेष झाला. पशुपालकांसाठी हे गवताळ प्रदेश जनावरांच्या चाऱ्याचे मुख्य ठिकाण हाेते. मात्र आता शेतकऱ्यांना स्वत:च्या उपजीविकेचा प्रश्न सतावू लागला आहे.
अशा स्थितीत पशू पालन करायचे तरी कसे? म्हणूनच जनावरे बाजारात विकली जात आहेत. काही दिवसांपूर्वी मॅनिटाेबाच्या तलाव क्षेत्रात जनावरांची माेठ्या प्रमाणात विक्री झाली हाेती. तरुण शेतकरी स्टुअर्ट मेल्निचुक म्हणाले, चाराक्षेत्र घटल्याने मी २५० गायींची विक्री केली आहे. शेतातील कडबा खाऊ घालून मला त्यांना वाचवता येणे शक्य नव्हते. माझे प्रयत्न अयशस्वी ठरले. आता गायी-बैलांसाठी नवे चाराक्षेत्र तयार करण्याचा प्रयत्न आहे. भविष्यात अशा संकटाचा सामना करण्याची गरज पडू नये, असा त्यामागील उद्देश आहे. दुष्काळाचा परिणाम कृषी अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळ राहू शकताे. कारण मॅनिटाेबाची माेठी लाेकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.
पशुपालकांची चिंता महत्त्वाची
अमेरिकेचे कृषी तज्ज्ञ मायकल डुगइड यांनी चाराक्षेत्राला सुरक्षित ठेवण्याच्या याेजनेवर काम करावे असा सल्ला दिला आहे. कॅनडाच्या अनेक भागांत मातीचे उत्खनन राेखून चाराक्षेत्र संरक्षित करता येऊ शकेल. पशुपालक तसेच चाराक्षेत्राचा विचार केला नाही तर आपल्याला मागास राहावे लागेल. हे चाराक्षेत्र पाळीव जनावरांचा आधार आहेत, असे मायकल यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.