आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:अफगाणिस्तानात दुष्काळाचे संकट, स्थलांतर आणखी वाढेल; फलकांवरून महिलांना हटवण्याकडे तालिबानचे जास्त लक्ष

सोमिनी सेनगुप्ता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकी ड्रोन हल्ल्यात नुकसान झालेली गाडी व घराला पाहताना लोक. - Divya Marathi
अमेरिकी ड्रोन हल्ल्यात नुकसान झालेली गाडी व घराला पाहताना लोक.

अफगाणिस्तानात हवामान संकटामुळे संघर्ष आणखी वाढू शकतो. येथील काही भाग जागतिक सरासरीपेक्षा दुप्पट उष्ण आहेत. पाऊस कमी आहे. कृषीयोग्य उत्तर आणि पश्चिम भागात ३ वर्षांत दुसऱ्यांदा दुष्काळ पडला. काबूल विद्यापीठातील प्राध्यापक नूर अहमद अखुंदजादा म्हणतात, तीन चतुर्थांश लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि कोणतेही अनपेक्षित हवामान नवे संकट आणू शकते. विशेषत: अशा देशात जेथे कोणतेही स्थिर सरकार नाही. सुमारे एक तृतीयांश लोक अन्न संकटाचा सामना करत आहेत. या युद्धामुळे अनेक जण पिकांची लावणी करू शकले नाहीत. दुष्काळामुळे पीक वाया जाणे नक्की आहे. जागतिक खाद्य कार्यक्रमाचे म्हणणे आहे की, ४०% पीक वाया गेले आहे व गव्हाचे दर २५% वाढले आहेत. जगातील सर्वाधिक हवामान बदलाच्या तावडीत सापडलेल्या देशात संघर्ष व अशांतता आहे. उष्णता व दुष्काळामुळे अफगाणिस्तान मुलांसाठी जगातील १५ वा जोखीम असलेला देश आहे. २० लाख मुले कुपोषित आहेत. तालिबान समस्या सोडवण्याऐवजी फलकांवरून महिलांना हटवण्याकडे लक्ष देत आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, जल व्यवस्थापन तालिबानच्या वैधतेसाठी महत्त्वाचे असेल. पाणी नेहमीच मोठा मुद्दा राहिला आहे. हेरातच्या धरणावर तालिबानने अनेकदा हल्ले केले आहेत. २०१८ च्या दुष्काळात ३.७१ लाख लोकांनी घर सोडले होते.

तालिबान अफूच्या शेतीतून चीन-कतारसारख्या विदेशी शक्तींशी संबंध मजबूत करेल
या दुष्काळामुळे अफूची शेती बंद करण्याचे आश्वासन पूर्ण करणे तालिबानला अवघड झाले आहे. यात गहू, कलिंगडच्या तुलेतन कमी पाणी लागते आणि ते खूप जास्त फायदेशीर आहे. या शेतीतून वार्षिक $३००-४०० मिलियन मिळतात, त्यामुळे तालिबान संपन्न झाला. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, तालिबानला कतार आणि चीन सारख्या विदेशी शक्तींकडून वैधता प्राप्त करण्यासाठी अफूचा वापर करायचा आहे. ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूटच्या वांडा फेलबाल- ब्राऊन सांगतात, हा मोठा राजकीय मुद्दा होत आहे.

अमेरिकेसह संपूर्ण जगाने तालिबानला सरकार चालवण्यात मदत करावी : चीन
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांना सांगितले की, अफगाणिस्तानात बदलेल्या स्थितीत हे आवश्यक झाले आहे की, जगातील सर्व देशांनी तालिबानसोबत संबंध स्थापित करावेत. तालिबानला सक्रिय मार्गदर्शन करण्याचेही त्यांनी सांगितले. म्हणजे नवी राजकीय, आर्थिक, सामाजिक स्थिरता देता येईल. वांग म्हणाले, युद्धाद्वारे कधीच अफगाणिस्तानात अतिरेकी शक्ती नष्ट करण्याचे उद्दिष्ट साध्य होणार नाही हे पुरावे सांगतात.

अमेरिकी ड्रोन हल्ल्यात ६ बालकांसह ९ जण ठार
अतिरेकी संघटना इसिसच्या संशयित वाहनावर केलेल्या अमेरिकी ड्रोन हल्ल्यात एकाच कुटुंबातील सहा बालकांसह ९ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबातील सदस्यांनी हा दावा केला. मृतांच्या कुटुंबाने सांगितले, आम्ही अतिरेकी नाहीत. एका शेजाऱ्याने सांगितले, सर्वांनी मदतीचा प्रयत्न केला आणि आग विझवण्यासाठी पाणी आणले. तेथे पाच किंवा सहा जण मेल्याचे मी स्वत: पाहिले.

पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी अफगाणी क्रिप्टोकरन्सीत करताहेत गुंतवणूक
अफगाणिस्तानात बँकिंग यंत्रणा ध्वस्त आहे. या आर्थिक संकटात काही अफगाणी क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करत आहेत. त्यांचे पैसे सुरक्षित राहण्याची यात हमी आहे. अफगाणिस्तानात वेगाने त्याचा वापर वाढत आहे. २०२१ ग्लोबल क्रिप्टो अॅडॉप्शन इंडेक्समध्ये १५४ देशांमध्ये अफगाणिस्तान २० व्या क्रमांकावर आहे. वृत्तानुसार देशातील पीअर टू पीअय (पी२पी) एक्स्चेंज ट्रेड व्हॉल्यूमला वेगळे करण्यात अफगाणिस्तान सातव्या क्रमांकावर आहे. मात्र, देशातील किती लोकांनी क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक केली याचे आकडे नाहीत.

बातम्या आणखी आहेत...