आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Drugs India | Pakitan Drugs Smuggling India | Drug Smuggling By Sea To India Of 'Lashkar' Handlers, Also Networks In Many Places

नार्को टेररिझम:‘लष्कर’च्या हँडलरची भारतात समुद्रमार्गे ड्रग तस्करी, अनेक ठिकाणी नेटवर्कही; पाकची नवी चाल

पवनकुमार | नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानने दहशतवादी पोसण्यासाठी नवी चाल खेळली आहे. भारतात तरुणांना अंमली पदार्थांचे व्यसन लावण्याच्या मनसुब्याने लष्कर-ए-तोयबाचा हँडलर हाजी साहब ऊर्फ भाईजानकडे ड्रग सिंडिकेटचे काम देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत भारतात ड्रग्जच्या मोठ्या खेपा पोहोचवण्याच्या प्रकरणात हाजी साहबचा हात असल्याचे पुरावे तपास संस्थांना मिळाले आहेत.

भाईजान ड्रग पुरवठ्यासाठी गुजरात, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान व महाराष्ट्रासह अनेक राज्यांत नेटवर्क पसरवण्याचे काम करत आहे. हे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एनआयएने जाळे टाकण्यास सुरुवात केली.अटारी सीमेजवळ आढळलेले ड्रग्ज पंजाबमधून दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंडमध्ये पोहोचवण्यात येणार होते. त्याची माहिती एनआयएला मिळाली आणि एनआयएने दिल्ली, मुजफ्फरनगर, उत्तराखंड, जयपूरमध्ये एकूण 9 ठिकाणी छापे टाकले.

आधी ड्रोन व बोगद्यातूनदेखील खेप यायची

आधी ड्रग्जचे पार्सल सीमेवरून भारतीय सरहद्दीत रात्रीच्या वेळी फेकले जायचे. भारतातील तस्कर ते उचलून न्यायचे. सीमेवरील काही भागात तर बोगद्यातून ड्रग्ज पोहोचवला जात होता. सैन्याने पहारा वाढवल्यामुळे तस्करांनी ड्रोनचा पर्याय निवडला. त्या माध्यमातून आता तस्करी केली जाते.

ड्रग्जची पाकिटे समुद्रात फेकून पळून जातात

पाकिस्तानातील तस्करांकडून ड्रग्ज तस्करीसाठी सागरी मार्गाचा वापर वाढला आहे. कारण भारताची सागरी सीमा प्रचंड लांबीची असल्याने तस्कर सहजपणे काम करू शकतात. त्यामुळेच हाजी साहबकडून ड्रग्ज तस्करीचा प्रमुख मार्ग म्हणून गुजरातचा वापर केला जातो. सूत्रांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानात ड्रग्जचे छोटे बॉक्स तयार केले जातात. ते पॉलिथीनमध्ये पॅक केले जातात. त्यामुळे ते पाण्यात भिजत नाहीत. नंतर ते मच्छीमाराच्या नावेने भारतीय हद्दीत पाठवले जातात.

भारतीय तटरक्षक दलाच्या रडारपासून वाचण्यासाठी नेहमीच लहान बोटीचा वापर केला जातो. तटरक्षक दलाकडून मध्येच चौकशीची शक्यता दिसल्यास ही पाकिटे पाण्यात फेकली जातात. हे काम करणारे लोक पाकिटे फेकून तेथून पळ काढतात. परंतु त्या ठिकाणाचे नॉटिकल मिल नोंदवले जाते. त्याचे लोकेशन गुजरातमधील तस्करांना कळवले जाते. गुजरातचे नेटवर्क पाणबुड्यांच्या साह्याने ड्रग्जची खेप सुरक्षितपणे बाहेर काढली जाते.त्यामुळे ही तस्करी वाढली.

कोण आहे नेटवर्कचा म्होरक्या ‘भाईजान’?

एनआयएच्या सूत्रानुसार हाजी साहब ऊर्फ भाईजानचे नाव दोन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये पकडलेल्या 500 किलो ड्रग्ज-हेरॉइनच्या साठा प्रकरणात पहिल्यांदा समोर आले होते. तेव्हा एनआयएने बशीर दाऊद, मामद इब्राहिम सामा, तमन्ना गुप्ता, मेजर सिंह, साहिल शर्मा, अन्वर मसीह, सुखविंदर सिंह, मनतेज सिंह, अरमान बस्सर यांना अटक करण्यात आली होती.

हेरॉइन दुबईहून पाकिस्तान आणि पाकिस्तानातून गुजरातमध्ये पाठवण्यात आले होते. हाजी साहब ऊर्फ भाईजान पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या निधीसाठी काम करणाऱ्या सिंडिकेटशी जोडलेला होता. गुजरातच्या मुंद्रा बंदरावर 3 हजार किलो हेरॉइन जप्त केल्याच्या प्रकरणात एनआयए हाजी साहबचा किती हात आहे याचाही तपास करेल.पाकिस्तानातून भारतात सातत्याने कुरापती काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. तस्करीच्या माध्यमातून देशाचे नुकसान करण्याचे पाकचे मनसुबे आहेत.

बातम्या आणखी आहेत...