आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१ ऑक्टोबरला सुरू हाेणाऱ्या दुबई एक्स्पाेच्या तयारीला वेग आला आहे. हा इव्हेंट सहा महिने चालणार आहे. १९० हून जास्त देश या प्रदर्शनात सहभागी हाेणार आहेत. प्रत्येक देश आपली संस्कृती व क्षमतेचे प्रदर्शन करण्यासाठी मंडप उभारत आहे. त्यातच ५०० काेटी रुपये खर्चून भारताने ४८०० चाैरस मीटर भागात भारतीय तंबूला उभारण्याच्या कामाला अंतिम रूप दिले जात आहे. फरशी, लूक, पेंटिंग, दर्शनी भाग, संरचनेसह ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. एप्रिल २०२१ पर्यंत संरचनेच्या पातळीवरील काम पूर्ण हाेईल. त्यानंतर प्रदर्शनासंबंधी काम केले जाईल. जुलै २०२१ पर्यंत पॅव्हेलियन भारतीय एक्स्पाे टीमला साेपवला जाईल. भारतीय वाणिज्य दूतावासाच्या म्हणण्यानुसार यानिमित्ताने अमर्याद संधींसाेबत गतिशील भारत जगासमाेर येईल. या प्रदर्शनात आधुनिक भारताच्या उदयाचेदेखील प्रदर्शन केले जाणार आहे. त्याशिवाय भारत @75 चा जल्लाेष साजरा केला जाणार आहे. त्याचबराेबर आगामी ७५ वर्षांची दृष्टी काय असेल, याबद्दलची माहिती मिळेल.
भारताच्या उच्च तंत्रज्ञानासाेबतच विचारांचीदेखील जगाला आेळख हाेईल. त्याशिवाय पर्यटकांना भारतीय कला, संस्कृती, भाेजनाचाही आस्वाद घेता येणार आहे. एवढेच नव्हे तर एक्स्पाेदरम्यान भारतीय तीज, दीपावली, पाेंगल, वसंत पंचमी, हाेळीचेही आयाेजन केले जाणार आहे. भारतीय दूतावासाचे प्रवक्ते ‘भास्कर’ ला म्हणाले, भारत-यूएई व्यापार एका व्यापक मार्गावर आहे. निकटच्या भविष्यात द्विपक्षीय व्यापारात १०० अब्ज डाॅलरचा आकडा पार करेल. एक्स्पाेमध्ये हाेलाेग्राफिक प्रणालीद्वारे गांधीजींसाेबत चर्चा करत असल्याचा अनुभव घेता येऊ शकेल. भारतीय पॅव्हेलियनमध्ये फिरणाऱ्या पॅनलला माेझॅकच्या रूपात विकसित केले आहे. ते आपल्या परिघात फिरत विविध विषयांचे दर्शन घडवेल. ‘इंडिया आॅन द मूव्ह’ च्या संकल्पनेचे ते प्रतिनिधित्व करते. भारताचा समृद्ध वारसा, तंत्रज्ञानाचा विकास यांचा अनाेखा संगम येथे दिसून येईल. द इंडिया पॅव्हेलियन द स्टेट आॅफ द आर्ट इमारत आहे. प्रदर्शनातील सर्वात माेठ्या ३ मंडपांमध्ये भारताच्या मंडपाचा समावेश होतो. विविध राज्यांतील पर्यटन स्थळांचीही लोकांना माहिती मिळेल.
दोन विभागांत पॅव्हेलियनचे विभाजन
पहिल्या भागात भारताची कहाणी आहे. प्रदर्शनात येणाऱ्या लाेकांना भारत समजून घेता येईल. अनुभव येईल. दुसरा भाग उद्याेग घडामाेडींचा आहे. पॅव्हेलियनमध्ये प्रवेश करताना तुम्हाला एका भुयारामार्गे अंतराळासारख्या वातावरणात जाता येईल. यात भारताच्या मंगळ िमशनला एका अद्भुत कहाणीद्वारे मांडण्यात आले आहे. त्यानंतर आराेग्य, याेगाचा परिचय हाेईल. पहिल्या माळ्यावर रंगीबेरंगी भारताचे दर्शन हाेईल. दुसऱ्या माळ्यावर मेक इन इंडियाचे सादरीकरण आहे. तिसऱ्या मजल्यावर सहा महिन्यांच्या कालावधीत काॅर्पाेरेट इंडिया दिसून येईल. येथे मल्टिपर्पज हाॅल आहे. दिवसभर येथे व्यापारी चर्चा आणि सायंकाळी चित्रपटाचाही आनंद घेता येईल. तंत्रज्ञान, उत्पादन, सेवा, व्यापाराच्या संधी असतील. प्रत्येक राज्यात व्यापार प्रदर्शन, गुंतवणुकीची संधी, व्यापार, उद्याेग, स्टार्ट-अप, साहित्य-संस्कृती आणि भाेजन असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.