आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Dubai New Upates: Dubai's New Master Plan In The Desert; By 2040, 60 Percent Of The Land Will Be Green; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:वाळवंटात वसलेल्या दुबईचा नवा मास्टर प्लॅन; 2040 पर्यंत 60 टक्के भूभागात दिसेल हिरवळ

दुबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिरवळ वाढवण्यासाठी शहरी-ग्रामीण भागांत समन्वयाचे सूत्र

ऐकताना मजेशीर वाटते, मात्र वाळवंटातील देश दुबईला आता अर्ध्यापेक्षा जास्त भाग हिरवागार करायचा आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दुबई अर्बन मास्टर प्लॅन २०४० नुसार दुबईच्या ६०% भागांत हिरवळ करायची सरकारची योजना आहे. दुबईला राहण्यासाठी व कामासाठी जगातील सर्वात सुंदर शहर करायचा हेतू राजे शेख मोहंमद बिन राशिद अल मकतूम, पंतप्रधान व दुबईच्या शासकांनी जाहीर केलेल्या मास्टर प्लॅनचा आहे. २००८ पर्यंत दुबईच्या एकूण क्षेत्रफळाच्या ८% भागांतही हिरवळ नव्हती.

मात्र, २०२० पर्यंत शहरी भागाच्या ३५% भागांवर हिरवळ दिसू लागली. हा भाग दुबईच्या २०% एवढाच आहे. योजनेत मुख्यत्वे पाच शहरी केंद्रांवर (तीन सध्याचे आणि दोन नवे) लक्ष केंद्रित करण्यासह दुबईतील शहरी भाग वाढवण्याचा विचार करण्यात आला आहे. यासाठी संसाधनांचा योग्य वापर, जिवंत, निराेगी व सर्वसमावेशक समुदाय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच हिरवळ आणि आराम करण्यासाठीचे भाग व सार्वजनिक बगिचे दुप्पट केले जातील. दुबईची लोकसंख्या २०४० पर्यंत ५८ लाख होण्याचा अंदाज आहे.

समुद्रकिनाऱ्यांची लांबी ४००% वाढवली जाईल

  • निसर्ग व ग्रामीण नैसर्गिक भाग अमिरातच्या क्षेत्राच्या ६० टक्के असेल.निवासी भाग व कार्यस्थळांना जोडण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर केले जातील. यामुळे पायी चालणारे व सायकल चालवणाऱ्यांची सोय होईल.
  • हॉटेल व पर्यटनासाठीच्या भूभागात १३४% वाढ होईल. शिक्षण व आरोग्य सुविधांसाठीच्या भूभागात २५% वाढ होईल, समुद्रकिनाऱ्यांची लांबी ४००% पर्यंत वाढेल.

बातम्या आणखी आहेत...