आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब! 122 कोटींचा कारचा नंबर!:जगात सर्वात महागडा नोंदणी क्रमांक: रमजानमध्ये लोकांच्या जेवणासाठी रक्कम खर्च होणार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबईमध्ये एका कारच्या नोंदणी क्रमांकाचा 5.5 कोटी दिरहम म्हणजेच 122 कोटी 60 लाख रुपयांना लिलाव झाला आहे. हा क्रमांक आहे P 7, म्हणजे फक्त एक अक्षर आणि एक डिजिट. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही याचा समावेश करण्यात आला आहे. तथापि, त्याच्या खरेदीदाराची ओळख उघड करण्यात आली नाही.

'मोस्ट नोबल नंबर्स' नावाचा हा धर्मादाय लिलाव दरवर्षी येथे होतो. यामध्ये जगभरातील भूकबळी दूर करण्यासाठी निधी उभारला जातो. त्याचे संस्थापक यूएईचे पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम आहेत.

यापूर्वीचा विक्रम पी 1 च्या नावे होता

यापूर्वी 2008 मध्ये, P1 या क्रमांकाचा 5.22 कोटी दिरहमला(रु. 116 कोटी) लिलाव झाला होता. हा क्रमांक दुबईचे स्थानिक व्यावसायिक सईद अब्दुल गफ्फार खौरींनी विकत घेतला होता. हा कार्यक्रम दुबईच्या रस्ते आणि वाहतूक प्राधिकरण आणि दूरसंचार कंपन्यांनी आयोजित केला होता.

बोली काही सेकंदातच 1.5 ते 3 कोटी दिरहमपर्यंत पोहोचली

P 7 क्रमांकाच्या लिलावात बोली 1.5 कोटी दिरहमपासून सुरू झाली आणि काही सेकंदांतच 3 कोटी दिरहमवर व नंतर 3.5 कोटी दिरहमवर पोहोचली. ही बोली टेलिग्राम अॅपचे मालक आणि UAE मध्ये राहणारे फ्रेंच व्यापारी पॉवेल दुरोव यांनी लावली होती. त्यानंतर 5.5 कोटी दिरहमवर बोली फायनल झाली.

हे युनिक क्रमांकही विकले गेले

या कार्यक्रमात इतर अनेक नंबर आणि फोन नंबरचाही लिलाव करण्यात आला. यामध्ये AA19, AA22, AA80, O71, X36, W78, H31, Z37, J57, N41, Y900, Q22222 आणि Y6666 सारख्या विशेष दोन-अंकी क्रमांकांचा समावेश आहे. प्लेट AA19 49 लाख दिरहममध्ये विकत घेण्यात आली.

कार्यक्रमातून मिळालेल्या पैशांतून लोकांना जेवण दिले जाईल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिलावातून सुमारे 10 कोटी दिरहम जमा झाले, ज्याचा वापर रमजानच्या काळात लोकांना अन्न देण्यासाठी केला जाईल. तर, डीयू कंपनीचा प्लॅटिनम मोबाईल क्रमांक (971583333333) 4.46 कोटी रुपयांना विकला गेला.

'मोस्ट नोबल नंबर्स' इव्हेंटचा उद्देश

वास्तविक, UAE चे पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी जगातील सर्वात मोठा रमजान फूड सस्टेनेबल एंडोमेंट फंड तयार करण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचे नाव आहे 'वन बिलियन मील एंडोमेंट'. जगातील उपासमारीचा सामना करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे. त्याअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.