आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दुबईचे शासक शेख माेहंमद बिन राशिद अल मकतूम यांच्या पत्नीचे बॉडीगार्डसोबत नाते होते. तिने बॉडीगार्डला त्यांच्या नात्याबाबत शांत राहण्यासाठी सुमारे १२ कोटी रुपयेही दिले होते. ब्रिटनच्या न्यायालयातील सुनावणीच्या आधारावर डेली मेलने हा दावा केला आहे. दुबईच्या शासकाने राजकुमारी हया यांना न सांगता शरिया कायद्यांतर्गत त्यांना फेब्रुवारी २०१९ मध्ये फारकत दिली होती. वृत्तानुसार राजकुमारी हया यांचा बाॅडीगार्ड रसेल विवाहित होता. मात्र, अफेअरमुळे त्याचे लग्न तुटले. राजकुमारी हया तिच्या बॉडीगार्डला महागडे गिफ्ट द्यायची. त्यात १२ लाखांचे घड्याळ आणि ५० लाखाची बंदूक अशा वस्तूंचा समावेश आहे.
वृत्तानुसार ४६ वर्षांची राजकुमारी हया यांचे इंग्लंडचा ३७ वर्षांचा बॉडीगार्ड रसेल फ्लॉवरसोबतचे अफेअर सुमारे २ वर्षे चालले. राजकुमारी हयाने इतर तीन बॉडीगार्डनाही रसेलसोबतच्या नात्यांवर चूप राहण्यासाठी कोट्यवधी रुपये दिल्याचेही सांगण्यात येते. दरम्यान, बॉडीगार्ड रसेल फ्लॉवरशी संपर्क साधला असता त्याने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, तर हया यांनी रसेलसोबतच्या अफेअरचे खंडन केले आहे.
शेख यांची सहावी आणि सर्वात कमी वयाची पत्नी
राजकुमारी हया २०१८ मध्ये दुबईतून पळाल्या आणि आता लंडनमध्ये राहतात. तसेच त्यांना दोन मुलेही आहेत. त्या दुबईचे शासक शेख मोहंमद बिन राशिद अल मकतूम यांची सहावी आणि सर्वात कमी वयाच्या पत्नी होत्या. मुलांच्या पालकत्वाबाबत राजकुमारीने इंग्लंडमध्ये खटला दाखल केला आणि त्याचा निर्णय हयाच्या बाजूने लागला होता. अफेअर २०१६ मध्ये सुरू झाले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.