आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्री-वर्कआऊट पावडर जुगाराप्रमाणे:सोशल मीडियामुळे याचा वाढत आहे बेसुमार वापर

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिममध्ये जाणाऱ्या तरुणाईची संख्या २०१९ च्या तुलनेत ७०% नी वाढली आहे. सोशल मीडियामुळे मांसपेशीची शक्ती वाढवण्याची क्रेझ वाढत आहे. कोरोना महामारीत जिम बंद होते. त्यामुळे तंदुरुस्त राहणे व शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता दूर करण्यासाठी सोशल मीडियात प्रा-वर्कआऊट पावडर वापरण्याचा सल्ला लोकांना देण्यात आला.

यामुळे तरुणाई याचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागली. गेल्या दोन दशकात ३० पेक्षा जास्त अभ्यासांत समोर आले की, अशा प्रकारच्या सप्लिमेंटचा वापरामुळे व्यसन लागण्याची जोखीम जास्त असते. अशा सप्लीमेंट्समध्ये अॅनाबोलिक स्टेरॉइड जास्त असते. यामुळे या सप्लीमेंट निर्मात्यांना एफडीएने नोटीसही जारी केली होती. प्री-वर्कआऊटसारख्या उत्पादनांचा वापर कॉलेज आणि व्यावसायिक खेळाडूंत असुरक्षित मानले जाते.

कॅफिन व अॅमिनो अॅसिडसारखे रसायन असतात प्रोटीन पावडर व्यायामादरम्यान पोषक तत्त्वाची मात्रा प्रदान करते. मात्र, याचा त्वरित फायदा होत असल्याचा प्री-वर्कआऊटचा दावा आहे. हे दोन पद्धतीचे असते. स्टिम आणि नॉन-स्टिम. स्टिम किंवा स्टिम्युलेंट प्री-वर्कआऊटमध्ये कॅफिन असते. दुसरीकडे, नॉन-स्टीममध्ये न्यूट्रोपिकसारखे तत्त्व असतात. बीटा-अनानिन आणि अॅमिनो अॅसिडही यात असते.