आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा(नोएल इलियन)
जगभरात कोरोनाचा कहर लक्षात घेऊन लाॅकडाऊन आहे. काही ठिकाणी बाजार सुरू होत असले तरी स्वित्झर्लंडमध्ये अजूनही अशी सवलत मिळालेली नाही. तेथे जिमपासून बाजार आणि फिटनेस पार्लर सर्वच बंद आहे. यामुळे लोक तंदुरुस्तीसाठी जुन्या पद्धती स्वीकारत आहेत आणि व्यायामशाळांमध्ये जात आहेत. झुरिचमध्ये १९६८ मध्ये अशा अनेक जागा बनवण्यात आल्या होत्या, जेथे जाऊन लोक व्यायाम आणि इतर शारीरिक कसरती करायचे. लॉकडाऊनमुळे आता अनेक जण या ठिकाणी पुन्हा जाऊ लागले आहेत. यातील एक आहेत ५८ वर्षांचे फिटनेस ट्रेनर बीट श्लाटर. ते एका हॉटेलात एक्झिक्युटिव्ह आहेत. ते सांगतात, मी आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस फिटनेस ट्रेनिंग करतो. मात्र सर्वच बंद असल्याने जिममध्ये जाऊ शकत नव्हतो. व्यायामाचे साहित्यही विकत घेऊ शकत नव्हताे. यामुळे मी जुन्या पद्धती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. बालपणी आम्ही येथे खेळायचो. स्वित्झर्लंडमध्ये या ठिकाणांना विटापार्कोर्स किंवा पार्काेर्स म्हटले जाते. श्लाटर विटापार्कोर्समध्ये जाणारे एकटे नाहीत. सिबली हर्लिमान तर कोरोना येण्याच्या आधीपासूनच प्रत्येक आठवड्याला येथे येऊन व्यायाम करतात. त्या सांगतात, मला जंगलात वेळ घालवणे आणि ताज्या हवेत व्यायाम करण्यात आनंद मिळतो. लोक येथे नेहमी मॉर्निंग वॉकसाठी येतात. मात्र, १६ मार्चला लाॅकडाऊन लागू झाल्यानंतर येथे गर्दी वाढू लागली आहे.१९६८ मध्ये झुरिचमधील एका क्रीडा मंडळाला ही कल्पना सुचली होती. तेव्हा झुरिच विमा ग्रुपच्या सहायक कंपनीच्या मदतीने जंगलात व्यायाम केंद्र बनवण्यात आले. सर्व साहित्य झाडांच्या फांद्या आणि लाकडांनी बनवण्यात आले. मंडळाचे खेळाडू येथेच प्रशिक्षण घ्यायचे. बेसल विद्यापीठात इतिहासाचे प्रा. मार्टिन लेंग्वेलर सांगतात की, विटापार्कोसने लोकांना त्यांचे आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहन दिले.हळूहळू ही संकल्पना शेजारचा देश जर्मनीतही पोहोचली. तेथे या प्रकारच्या आऊटडोअर सर्किटला ट्रिम-डिच-पफेड नाव देण्यात आले. ज्याचा अर्थ आहे तंदुरुस्ती मिळण्याचा मार्ग. त्याची सुरुवात एका क्लबने केली होती, जो आज जर्मन स्पोर्ट॰स फेडरेशनच्या नावाने ओळखला जातो. १९७० च्या दशकात या सर्किट्सवर लाखो युरोपियन व्यायाम करायचे. व्यावसायिक जिम सुरू होण्याआधी तेथे चांगलीच गर्दी असायची. आता कोविड-१९ ने पुन्हा एकदा लोक त्याकडे वळू लागले आहेत.
पुल-अप, बेंच प्रेससारख्या आधुनिक सुविधा
या व्यायामशाळा किंवा विटापार्कोस सुमारे ३ किमी अंतरावर आहेत, ज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आधुनिक जिमसारखी उपकरणे आहेत. यात शरीराला मजबूत, लवचिक आणि आकर्षक करणारी १५ पेक्षा जास्त ठिकाणे आहेत. प्रत्येक ठिकाणी त्याच्या वापराची पद्धत आणि किती वेळा करायचे आहे याची माहिती दिली आहे. सीट-अप, पुल-अप आणि बेंच प्रेससारख्या कामांसाठी लाकडी उपकरणे लावली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.