आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सॅक्रामेंटो:अमेरिकेमध्ये वणव्यामुळे शहरांतील आकाश नारिंगी, तीन हजार चौरस किमी क्षेत्र खाक...

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांता क्लारा येथून तन्मय वाघ यांनी खास दिव्य मराठीसाठी हे छायाचित्र पाठवले आहे. येथे २० दिवसांपासून आकाशात तांबडा रंग दाटलेला आहे.

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया व आेरेगन राज्यातील वनक्षेत्रातील वणव्याचे लोट शहरांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे कॅलिफोर्नियाची राजधानी सॅक्रामेंटो व सॅन फ्रान्सिस्कोसह किमान ५ शहरांतील आकाश नारिंगी तसेच लाल बनले आहे. दोन्ही राज्यांत सुमारे ३ हजार चौरस किमी क्षेत्रात आगीने हाहाकार उडवलाय. कॅलिफोर्नियात आगीमुळे चोवीस तासांत तीन जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत येथे ११ जणांचा मृत्यू झाला. कॅलिफोर्नियात सर्वात आधी १७ ऑगस्ट रोजी आेरिव्हिलेमध्ये वणवा लागला होता.

राज्यात सुमारे २ लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. आेरेगनचे गव्हर्नर केट ब्राऊन म्हणाले, राज्यात ताशी ८० किमी वेगाने वारे वाहत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण बनले आहे. पश्चिम क्षेत्रातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.