आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळानंतर उलथापालथ झालेल्या जगात ३५ वर्षांखालील अनेक युवकांमध्ये नवीन कल दिसत आहे. या युवकांनी भविष्याचा विचार कमी केला आहे. त्याऐवजी ते कमाईचा बहुतांश भाग खर्च करत आहेत, आधीच्या तुलनेत बचत कमी करून आपली आवड जोपासत आहेत.
न्यूयॉर्कमधील २७ वर्षीय निमर्ता नारंग मागील वर्षापर्यंत प्रत्येक बाबतीत दूरचा विचार करत असे. त्यानंतर आयुष्य एवढे सतर्क राहून जगायचे नाही, असे तिला वाटले. ती म्हणते,‘कोरोना काळात मी कुटुंबाच्या भेटीसाठी बँकॉकला जाऊ शकले नाही.
अलीकडे गेले तेव्हा मी आईचा ५० वा वाढदिवस, आजीचे अंत्यसंस्कार, बहिणीचा साखरपुडा, वडिलांची देखभाल अशा कितीतरी गोष्टी गमावल्या होत्या. आता काही वेगळे करायचे असे तेथून परतल्यानंतर मी ठरवले. कोरोनाआधी मी दरमहा २ हजार डॉलर बचत खात्यात जमा करायचे. आता ही रक्कम अर्धी झाली आहे. उर्वरित रक्कम महाग अपार्टमेंटचे भाडे, मित्र-मैत्रिणींसोबत सायंकाळ व्यतीत करणे आणि लहानसहान छंद पूर्ण करण्यावर खर्च करत आहे.’ निमर्ता अशी एकटी नाही. एका सर्व्हेत असे समोर आले होते की, १८ ते ३५ वर्षे वयाच्या ४५% तरुणांना बचत करण्यात काही अर्थ आहे, असे वाटत नाही. ५५% नी सांगितले की, आम्ही सेवानिवृत्ती योजना टाळली आहे. महामारीत विलगीकरणाच्या आयुष्याने लोकांना प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचे महत्त्व शिकवले आहे. अनेकांना हवामान बदल, युक्रेन-रशिया युद्ध, वाढती महागाई, शेअर बाजारातील चढ-उताराने चिंतेत टाकले आहे. त्यामुळे ते दीर्घ काळासाठी कुठलीही योजना बनवत नाहीत. डेनव्हरची २७ वर्षीय हन्ना जोनस म्हणाली,‘मी खूप बचत करत असे. ओटीटीचे सबस्क्रिप्शनही घेत नसे. आता मी कमी बचत करते.’ २५ वर्षीय फुलरनेही हॉटेलमध्ये स्वस्त मेनू ऑर्डर करणे बंद केले आहे. २५ वर्षीय जिमेनेज म्हणतो,‘जगात सध्या खूप अनिश्चितता आहे. आवड जोपासून जगण्याची शिकवण कोविडने दिली आहे.’
प्रत्येक पिढीचा आपल्या जीवनाविषयी वेगळा दृष्टिकोन आहे
मानसशास्त्रज्ञ ब्रॅड क्लॉन्ट्ज म्हणाले की, ‘आता खर्च करा’ अशी भूमिका २०२२ मधील तरुणांचीच नाही तर प्रत्येक पिढीचा आपल्या जीवनाविषयी वेगळा दृष्टिकोन राहिला आहे. महामंदीच्या काळातही अनेक लोकांचा बँकांवरील विश्वास उडाला होता. शीतयुद्धाच्या शिखरावर आण्विक युद्धाच्या भीतीने अनेक युवकांच्या योजना बनवण्याच्या पद्धतींना प्रभावित केले होते. २००८ च्या आर्थिक संकटातही लोकांना घरासाठी बचत करणे व्यर्थ वाटत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.