आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Due To Unavailability Of Vaccines From Pharmaceutical Companies, Taiwan Made Its Own, The First Dose Being Taken By President Tsai Ing wen Himself

तैवान:औषध कंपन्यांकडून लस उपलब्ध न झाल्याने तैवानने स्वत:च बनवली, पहिला डोस स्वत: राष्ट्रपती साई इंग वेन यांनी घेतला

तैवान2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनचा शेजारी व कट्टर विरोधक देश तैवानने कोरोनाची स्वत:ची पहिली लस मेडिजन बनवली आहे. विशेष म्हणजे सोमवारी त्याचा पहिला डोस राष्ट्रपती साई इंग वेन यांनी घेतला. यावेळी राष्ट्रपती साई म्हणाले की, लस पूर्णपणे सुरक्षित आहे. देशातील लोकांच्या मनात शंका राहू नये म्हणून मी पहिला डोस घेतला. यानंतर मेडिजन लसीसाठी आतापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली आहे. या लसीच्या दोन डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर आवश्यक असल्याचे सांगण्यात येते.

तैवानमध्ये जागतिक औषधी कंपन्यांकडून लस पुरवठ्यात उशीर होत होता. यामुळे लसीकरण मंदावले होते. यामुळै देशाने स्वत:च कोरोना लस तयार करून तैवानच्या लोकांना डोस देण्याचा निर्णय घेतला. तैवान चीनचा कट्टर विरोधक म्हटला जातो. शेजारी असूनही चीनची मदत घेतली नाही. आतापर्यंत येथे अमेरिकेची लस दिली जात होती. तैवानमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी असल्याने आशियातील इतर भागाच्या तुलनेत लसीकरण मोहिम जलद करण्याचा दबाव नाही.

४०% लोकांना दोन्ही, तर ३% ना एक डोस
२.३८ कोटी लोकसंख्येच्या तैवानमध्ये आतापर्यंत १५९३२ कोरोना रुग्ण आढळले आहेत. ८२८ मृत्यू झाले आहेत. तर १४८६८ जण बरेही झाले आहेत. तैवानमध्ये रोज काेरोनाचे सरासरी १० रुग्ण आढळत आहेत. दुसरीकडे देशात ४० टक्के लोकांनी दोन्ही डोस तर ३ टक्के लोकांनी एक डोस घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...