आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बांगलादेशमध्ये नवरात्राैत्सव २२ ऑक्टाेबर ते २६ ऑक्टाेबरपर्यंत असेल. मात्र काेराेनामुळे यंदा राजधानी ढाक्यात दुर्गा मंडप व पूजेचे स्वरूप लहान असेल. ढाक्यात माेठे मंडप दिसणार नाहीत. लहान-लहान मूर्ती किंवा घट स्थापन करून अनुष्ठान पूर्ण केले जातील. काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन माेठे मंडप, शाेभायात्रा व मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीला परवानगी दिलेली नाही. येथे भारत व नेपाळनंतर सर्वाधिक हिंदूंची लाेकसंख्या आहे. बांगलादेश हिंदू बाैद्धिस्ट ख्रिश्चियन परिषदेचे सरचिटणीस मनिंद्रकुमार नाथ म्हणाले, काेराेनाच्या बंदीदरम्यान येथे नवरात्राेत्सव साजरा केला जाईल. परंतु तरीही उत्सवाचा रंग वेगळा असेल. आम्हीदेखील सरकारच्या सर्व सूचनांचे काटेकाेर पालन करू. आम्ही माेठे मंडप लावणार नाहीत. खुल्या स्वरूपात हा उत्सव साजरा करू. लाेकांची गर्दी टाळण्यासाठी विशेष आरतीचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
देवीमातेची मूर्ती घडवण्याच्या कामात जीवन समर्पित करणारे हरिपदा पाल म्हणाले, आपण परिसरातील लाेकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. परंतु पूजेला राेखले जाऊ शकत नाही. गणेशाच्या मूर्तीला अंतिम रूप देणारे नारायण पाल म्हणाले, यंदा मला ८ ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यांचीच वेळेत पूर्तता करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी १३ ऑर्डर मिळाल्या हाेत्या. परंतु मला याबद्दल काहीही तक्रार नाही. कमीत कमी उदरनिर्वाह करू शकताे. ही गाेष्ट माझ्यासाठी माेठी आहे, असे त्यांनी सांगितले. येथे ढाक्यात दशकांची परंपरा असलेला कालाबागान पूजा मंडप सर्वांच्या परिचित आहे. येथील पूजा समितीच्या म्हणण्यानुसार आम्हाला मंडप उभारणीसाठी परवानगी मिळालेली नाही. आम्ही नगरपालिकेसाेबत चर्चा करत आहाेत. समितीचे सदस्य कुंडू म्हणाले, आम्ही पंचमीला एक घाट पूजन करू इच्छिताे. ही आमची परंपरा आहे. ती पूर्ण करायची आहे. येथे आता सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य सजावट व भाेजनाची उत्तम व्यवस्था यासाठी प्रसिद्ध ढाक्यातील डीआेचएस पूजा मंडपात नवरात्राैत्सवाची तयारी सुरू आहे. समितीचे सरचिटणीस अनुपकुमार म्हणाले, यंदा आम्ही सर्व लक्ष अनुष्ठान पूर्ण करण्यावर केंद्रित केले आहे. आम्ही सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत. सामाजिक जबाबदारी निभावताना गरजवंतांना मास्क देत आहाेत. काेराेनाच्या काळात हीच सर्वात माेठी पूजा आहे. दुसरीकडे सांस्कृतिक कार्यक्रमांना ऑनलाइन अॅक्टिव्हिटिजमध्ये रूपांतरित करण्याचीदेखील तयारी सुरू आहे. ढाक्यात बाह्य निर्बंधांत सूट देण्यात आली आहे. ढाक्याबाहेर बरिशलमध्ये ६१७ उत्सव मंडळ, तर रंगपूरमध्ये ९३९ दुर्गा मंडळे आहेत. या विभागातील ८ जिल्ह्यांत ५२०० मंडपे असतील. इतर सर्व जिल्ह्यांत पूर्वीसारखाच उत्साह पाहायला मिळेल. काेराेनासाेबत नवरात्राैत्सवाची तयारी सुरू आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.