आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • During Parental Leave, Men Learn New Skills And Strengthen Their Resumes, While Women Spend Time Raising Children.

संशोधन:‘पॅरेंटल लीव्ह’मध्ये पुरुष नवी कौशल्ये शिकून रेझ्युम मजबूत करतात, महिलांचा वेळ मुलांच्या संगोपनात जातो

​​​​​​​ओरेगन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिव्य मराठी विशेष : ऑफिसपासून दूर राहिल्याने महिलांच्या प्रगतीवर परिणाम

अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ माइनेतील मानसोपचार विभागाच्या एका संशोधनात समोर आले की, पॅरेंटल लीव्हमध्ये महिला बहुतांश वेळ मुलांच्या देखभालीत घालवतात. तर पुरुष ऑफिसच्या कामकाजाशी संबंधित कामांत आपला वेळ घालवतात. वेळेच्या उपयोगातील हाच फरक नंतर महिला आणि पुरुषांच्या रिझ्युममध्ये दिसतो. जसे की पुरुष नवीन जबाबदारी घेण्याची इच्छा अधिक दर्शवतात. नवीन रोजगार शोधतात, नवी कौशल्ये शिकतात आणि बिझनेससाठी आयडिया शोधतात.

महिला आणि पुरुषांत विचार करण्याचा हा फरक केवळ मोठ्या वयातील कार्यरत लोकांतच बघायला मिळत नाही तर कमी वयाच्या तरुणांतही तो बघायला मिळतो, जे सध्या नोकरीत नाहीत. संशोधनात सहभागी कॉलेज विद्यार्थ्याना विचारले गेले की त्यांना भविष्यात पॅरेंटल लीव्ह मिळाल्यास ते तिचा कसा उपयोग करतील. त्यांनी कार्यरत लोकांप्रमाणेच उत्तर दिले. सुट्यांमध्ये महिला आणि पुरुषांत आपल्या नोकरीविषयी कोण अधिक समर्पित राहिले याच्या मूल्यांकनाचा मापदंड नसतो. त्यामुळे महिलांना पॅरेंटल लीव्हनंतर याबाबत पुरुषांपेक्षा वेगळ्या पद्धतीने बघितले जाते. रजा काळात ऑफिसचे काम केलेले नसतानाही महिला आणि पुरुषांना वेगवेगळी वागणूक दिली जाते. महिलांसोबत याबाबत सकारात्मक वागणूक मिळते तर पुरुषांसाठी नकारात्मक मानली जाते.

पॅरेंटल लीव्ह वाढवल्याने वाढू शकते लिंग समानता
पॅरेंटल लीव्हनंतर महिला मर्यादित कौशल्यासह नोकरीवर पोहोचतात. तर पुरुष जास्त कौशल्ये आणि मजबूत रिझ्युमसह कामावर परततात. संशोधनात म्हटले की, पॅरेंटल लीव्ह वाढवल्याने लैंगिक समानता घटण्याऐवजी वाढू शकते.