आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • During The Epidemic In Pakistan, The Price Of Alcohol Tripled And Sales Of Big Brands Were Mixed With Water

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्लामाबाद:पाकिस्तानात महामारीच्या काळात मद्याच्या दरात तीनपट वाढ, मोठ्या ब्रँडमध्ये पाणी मिसळून विक्रीचा सपाटा

इस्लामाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात मद्यावर बंदी, मागणी वाढल्याने चढ्या दराने विक्री, काळाबाजार तेजीत

महामारीच्या काळात पाकिस्तानात मद्याचा काळाबाजार तेजीत दिसतोय. लोक तीनपट जास्त पैसे देऊन दारू विकत घेत आहेत. मोठ्या ब्रँडच्या बाटल्यांत पाणी मिसळून विक्री वाढली आहे. पाकिस्तानात वास्तविक मुस्लिमांसाठी मद्यपान करण्यावर बंदी आहे. परंतु या नियमांकडे कानाडोळा करून मद्यपान करणारा मोठा वर्ग देशात आहे. दक्षिण सिंध प्रांतात गैरमुस्लिम ग्राहकांसाठी मद्याची दुकाने वैध आहेत. कराचीत अशाच एका दुकानावर काम करणारा राहुल म्हणाला, पैसे देणाऱ्या प्रत्येकाला दारूचा पुरवठा केला जातो. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व अनेक लोक मद्यपान करतात. कोण कुठल्या धर्माचा आहे, याचा माझ्या कामावर काही फरक पडत नाही. परंतु सतर्क राहणे गरजेचे आहे, असे राहुलला वाटते. राहुलला महिन्याला ५० हजार रुपये कमाई होते. मागील कामाच्या तुलनेत ही कमाई जास्त आहे, असे तो सांगताे. तो आधी कपड्याच्या कारखान्यात मजूर होता. इस्लामाबादचे उमर म्हणाले, आधी कधी-कधी पीत होतो. आता रोज पितो. चिंतामुक्त होण्यासाठी मला मद्याची मदत होते. ३८ वर्षीय पत्रकार हिरा म्हणाले, तीनपट महागडी व्हिस्की खरेदी केली. परंतु त्यात पाणी मिसळलेले होते. हा अनुभव अनेकांना आल्याचे त्यांनी सांगितले.

भुत्तोंनी केली होती दारूबंदी, झियांनी धर्माशी जोडले
पाकिस्तानात १९७७ मध्ये झुल्फिकार अली भुत्तो सरकारने दारूबंदी कायदा लागू केला होता. बार व क्लबला वगळले होते. त्यानंतर १९७९ मध्ये जनरल झिया-उल-हक यांनी दारूला गैरइस्लामिक घोषित केले आणि हा कायदा कठोरपणे अमलात आणला.

बातम्या आणखी आहेत...