आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका मृत होत असलेल्या ताऱ्याने एक ग्रह गिळंकृत केल्याची अनोखी हालचाल संशोधकांनी प्रथमच रेकॉर्ड केली आहे. या ताऱ्याचा आकार आपल्या सूर्याएवढा असल्याचे सांगितले जात आहे. तर गिळंकृत केलेला ग्रह हा आपल्या गुरू ग्रहाएवढा होता.
सीएनएननुसार हॉर्वर्ड विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीच्या संशोधकांनी ही सर्व प्रक्रिया बघितली. हे बघायला खूप भयावह वाटते. मात्र तरीही याची माहिती गोळा करणे महत्वाचे होते असे टीमचे सदस्य म्हणाले. या टीमनुसार एक दिवस आपला सूर्यही आपली पृथ्वी आणि पुढच्या तीन ग्रहांना असेच गिळंकृत करेल.
5 अब्ज वर्षांनंतर सूर्यही पृथ्वीला गिळंकृत करेल
संशोधक म्हणाले की त्यांनी यापूर्वी कधीही ताऱ्याची अशी हालचाल बघितली नव्हती. एमआयटीत यावर संशोधन करणाऱ्या किशले डे यांनी सीएनएनला सांगितले की, आम्ही खूप आधीपासूनच शिकत आलो आहोत की सूर्य एक दिवस आपली सौरमाला स्वतःमध्ये सामावून घेईल. 5 अब्ज वर्षांनंतर असे होईल असे त्या म्हणाल्या. तेव्हा पृथ्वी एका क्षणात नष्ट होईल. याचे एक उदाहरण आता आपल्यासमोर आहे.
संशोधकांनुसार ग्रह गिळंकृत केल्याची ही घटना 2020 मध्ये पृथ्वीपासून 12 हजार प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या एक्विला नामक सौरमालेत घडली. यावर संशोधन करणाऱ्या टीमला याचे आकलन होण्यास 3 वर्षे लागली. ग्रह गिळंकृत करणारा तारा आपल्या सूर्याप्रमाणेच 10 अब्ज वर्ष जुना होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.