आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • E Nose: Corona Can Detect Diseases From Asthma To Cancer By Breathing Only; There Is No Need Of 'samples'

दिव्य मराठी विशेष:ई-नोझ : केवळ श्वासाद्वारे कोरोना, अस्थमापासून ते कॅन्सरपर्यंतचे आजार ओळखेल; ‘सॅम्पल’ची कटकट नाही

लंडन12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटन-युरोपच्या रुग्णालयांत चांगले निकाल देतेय टेक्नॉलॉजी

रक्त न देता किंवा इतर सॅम्पल न देता आजाराचे निदान करणे शक्य आहे का? याचे उत्तर होय, हेच आहे. ही किमया ई-नोझ (इलेक्ट्रॉनिक नोझ) डिव्हाइसद्वारे शक्य झाली आहे. ई-नोझ फक्त श्वासाद्वारे कोरोना, अस्थमा, यकृताशी संबंधित आजारांसह अनेक प्रकारच्या कर्करोगांचे निदान करते. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, हे डिव्हाइस पुढील दोन-तीन वर्षांत क्रांतिकारी बदल घडवेल. याद्वारे लोकांची विविध आजारांच्या निदानासाठी वेगवेगळे सॅम्पल देण्यापासून सुटकाही होईल.

अनेक देशांत त्याचे क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. सर्वाधिक आशादायक निकाल ब्रिटनमध्ये मिळाले आहेत. कंेब्रिज येथील कॅन्सर रिसर्च यूके संशोधक व डॉक्टरांसाठी श्वासाची चाचणी घेत आहे. आजार ओळखण्यासह या तंत्रज्ञानाद्वारे रुग्णावर कोणत्या नवीन औषधांचा विशेष परिणाम होईल किंवा उपचार उपयुक्त ठरत आहे किंवा नाही याचा अंदाज घेतला जात आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसशी संबंधित युरोपच्या अनेक रुग्णालयांत फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी ब्रीद टेस्ट केली जात आहे. या डिव्हाइसमध्ये एक सिलिकॉनचा मास्क कॅमेऱ्याच्या आकाराच्या गॅजेटशी जोडलेला असतो. त्यातील सेन्सर श्वासाचे विश्लेषण करते.

श्वासात अमोनियाचा अधिक स्तर म्हणजे यकृत, मूत्रपिंडाचे विकार
नेदरलँडच्या रेडबाउंड युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे प्रो. पीटर सिर्सेमा म्हणाले की, आतडे आणि कोलोन कॅन्सरचे निदान श्वासातील रासायनिक बदलावरून होत आहे. आता यकृत आणि मूत्रपिंडाचा त्रास असलेल्या लोकांच्या श्वासात अमोनियाचे अति प्रमाण असल्याचे उघड झाले आहे. जर्मनीच्या एअरसेन्सने पेन ३ ई-नोज डिव्हाइसला पीसीआर टेस्टमधील पॉझिटिव्ह चाचण्यांद्वारे विषाणू ओळखण्यास शिकवले. ती ई-नोझ ८० सेकंदांतच कोरोनाचे निदान करण्यात सक्षम ठरले. संशोधनकर्त्यांनी मान्य केले की गर्दीच्या ठिकाणी ई-नोझ रिअल टाइम निदान करण्यातही सक्षम होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...