आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये याच वर्षी सप्टेंबरपासून ई-स्कूटरवर बंदी घालण्यात येणार आहे. जनतेचा कौल घेतल्यानंतर पॅरिसच्या महापौरांनी हा निर्णय घेतला आहे. यादरम्यान ८९ टक्के मतदारांनी ई-स्कूटरला रस्त्यावरून हटवण्याच्या बाजूने मतदान केले. वास्तविक ई-स्कूटर निर्मात्यांना हा निर्णय मागे घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून चालणाऱ्या ई-स्कूटर पॅरिसमध्ये २०१८ पासून सुरू आहेत. पाच वर्षांत ई-स्कूटर्समुळे अनेक गंभीर दुर्घटना घडल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.