आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • E SIM Powered IPhone 14, 14 Plus; Satellite Connectivity Will Also Be Available, Priced From 63 To 69 Thousand

दिव्य मराठी विशेष:ई-सिमने चालतील आयफोन 14, 14 प्लस; सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीही मिळणार, किंमत 63 ते 69 हजारांपर्यंत

क्युपर्टिनो (अमेरिका)25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ॲपलच्या वार्षिक आमसभेत यंदा दोन आयफोन-१४ व आयफोन-१४ प्लससह सिरीज-८चे घड्याळ, एअर पॉड्स सादर करण्यात आले. या वेळी सर्वाधिक चर्चा होती आयफोनच्या ई-सिम आणि सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीची. आयफोन-१४चे अमेरिकी मॉडेल्स ई-सिमवर चालतील. म्हणजे, सिम ट्रे यात नसतील. सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीमुळे रेंज नसतानाही इमर्जन्सी एसओएस करता येईल. ही सुविधा तूर्त अमेरिका व कॅनडातच मिळेल. आयफोन-१४ची किंमत सुमारे ६३ हजार रुपये, आयफोन-१४ प्लसची किंमत सुमारे ७१ हजारहून अधिक असेल. पहिले मॉडेल १६ सप्टेंबर, दुसरे १६ ऑक्टोबरपासून उपलब्ध असेल. ४८ एमपीच्या मुख्य कॅमेऱ्यासह मिळणारा आयफोन १४-प्रोची किंमत सुमारे ७९ हजार रुपये आणि प्रो मॅक्सची किंमत सुमारे ८७ हजार असेल. १४ प्लसमध्ये ६.७ इंच ओएलईडी डिस्प्ले मिळेल. दोनही व्हेरिएंटमध्ये १२ एमपी+१२ एमपी कॅमेरे असतील. अर्थात बार फ्रंट कॅमेऱ्यात मोठा सेन्सर मिळेल. सेल्फी कॅमेराही दर्जेदार असेल. कमी प्रकाशातही तो उत्तम छायाचित्रे घेऊ शकेल. व्हिडिओ क्वालिटीही एकदम दर्जेदार असेल.

ॲपल वॉच सिरीज 8 : पीरियड्स, ओव्हेल्युशन सायकलवर नजर ठेवणार ॲपलने सिरीज 8 चे घड्याळ सादर केले. ते डस्टप्रूफ, स्विमप्रूफ आणि क्रॅकप्रूफ असेल. डिस्प्ले मोठा. आई होण्यास इच्छुक महिलांच्या पीरियड्सवर तसेच ओव्हेल्युशन सायकलवर नजर ठेवू शकेल. जीपीएस व्हर्जनच्या वॉचची किंमत ३१ हजार रुपये तर सेल्युलर व्हर्जन ४० हजार रुपयांचे. प्री ऑर्डर सुरू झाली. विक्री १६ सप्टेंबरपासून. सिरीज ५ आणि त्यावरील वॉचमध्ये आता इंटरनॅशनल रोमिंग सुविधाही. याच शृंखलेत एसई आणि एसई २, अल्ट्रा वॉचही लाँच. हायकिंग करण्यासाठी अल्ट्रा मॉडेलमध्ये नवे वेफाइंडर. ॲपल वॉच अल्ट्राची किंमत आयफोनपेक्षाही जास्त. त्याची सुरुवातीची किंमत ६३ हजार रुपये. भारतात त्याची किंमत ८९,९०० रुपये असेल.

इअर पॉड्स : ॲपल वॉचच्या चार्जरचा वापर शक्य टिम कुक यांनी इअर पॉड्स प्रो 2 हेडफोन सादर केले. त्यात नव्या एच 2 चिप. ते आता आपल्या कानाच्या हिशेबाने पर्सनलाइज्ड स्पेशल ऑडिओलाही सपोर्ट करतील. त्यात ॲडव्हान्स्ड ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनची सुविधा. ॲपल वॉचचे चार्जर आता एअरपॉड्स प्रो 2 मध्येही वापरता येईल. एअरपॉड्स प्रो 2 ची किंमत २० हजार रुपये. प्री ऑर्डर ९ सप्टेंबरपासून, विक्री २३ सप्टेंबरपासून सुरू होणार.

बातम्या आणखी आहेत...