आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या पृथ्वीला एक शेजार आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? हा शेजारी हजारो-लाखो वर्षांपासून पृथ्वीच्या कक्षेत राहून सूर्याची नियमितपणे परिक्रमा करतो. खगोलशास्त्रज्ञ त्याला ‘ट्रोजन एस्टेरॉइड’ असे संबोधू लागले आहेत. त्याची रुंदी सुमारे १.२ किमी आहे. आगामी किमान चार हजार वर्षे हा पृथ्वीच्या मार्गानेच सूर्याची परिक्रमा करत राहील. चिलीमधील एका आधुनिक दुर्बिणीतून या लघुग्रहाचा शोध लागला आहे. त्यामुळे खगोलप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. आता खगोलशास्त्रज्ञ अशाच प्रकारच्या इतर लघुग्रहांचा वेध घेण्यासाठी अभ्यासाला लागले आहेत. आतापर्यंत पृथ्वी आपल्या कक्षेत एकटीच सूर्याला परिक्रमा करत असल्याची धारणा होती. आतापर्यंत हे गृहितक योग्य होते, परंतु हजारो वर्षे असे राहणार नाही. कारण पृथ्वीवासीयांना आता नवा शेजारी मिळाला आहे. त्याला ‘२०२० एक्सएल ५’ असे नाव देण्यात आले आहे. हा एक ‘ट्रोजन एस्टेरॉइड’ आहे. त्याबाबत पृथ्वीवरील लोकांना जास्त माहिती नव्हती.
हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत सूर्याची परिक्रमा करू लागला आहे. अशा प्रकारचे लघुग्रह मंगळ व बृहस्पतीच्या कक्षेत आढळून येतात. परंतु पृथ्वीजवळही एवढ्या मोठ्या आकारातील लघुग्रह असल्याचे लक्षात आले. हा लघुग्रह पृथ्वीच्या ६० अंश कोनात पुढे आहे. पृथ्वीच्या कक्षेत आढळून आलेला हा सर्वात मोठा लघुग्रह असल्याचा दावा बार्सिलोना विद्यापीठाच्या कॉसमॉस इन्स्टिट्यूटने केला आहे. याबद्दलची माहिती जर्नल नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रकाशित झाली आहे. सौरमंडळातील अनेक ग्रह लघुग्रहामुळे आेळखले जातात, परंतु पृथ्वीजवळ आढळलेला हा दुसरा मोठा लघुग्रह आहे.
कक्षेत असलेला पहिला लघुग्रह
संशोधनाचे प्रमुख सिझर ब्रिसेनो म्हणाले, एका कक्षेत काही गोष्टी असतात. हे घटक दोन गुरुत्वाकर्षण संतुलित क्षेत्रांपैकी एकाजवळ एकत्रित असतात. त्याला लॅग्रेंज पॉइंट असे म्हटले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.