आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी तीन शक्तिशाली भूकंपामध्ये २,५०० पेक्षा अधिक लोक ठार झाले व सुमारे ८ हजार लोक जखमी झाले. भूकंपाचा पहिला धक्का पहाटे ४.१७ वाजता ७.८ इतक्या तीव्रतेचा होता. दुसरा दुपारी १२ वाजता ७.५ आणि तिसरा ४ वाजता ६ तीव्रतेचा होता. भूकंपाचे केंद्र तुर्कस्तानचे शहर गाझियांटेप होते. ते सीरियापासून ९० किमी दूर आहे. तुर्कस्तानात १,६९८ व सीरियात ८०२ लोकांचा मृत्यू झाला. लेबनाॅन व इस्रायलमध्येही धक्के जाणवले.
अंकारामध्ये १ अंश तापमान, १० शहरांत सर्वाधिक नुकसान तुर्कस्तानातील अंकारा शहरात बचाव कार्यात अडचणी येत आहेत. कारण येथील तापमान १ अंश सेल्सिअस इतके आहे. भूकंप प्रभावित अंकारा, गाझियांटेप, कहरामनमारस, डियर्बकिर, मालट्या, नूरदगीसह १० शहरांत पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. येथे बहुतांश इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली लोक दबलेले आहेत. बचाव कार्य सुरू आहे. तुर्कस्तानचे उपाध्यक्ष फुआत ओक्ते म्हणाले, ‘आम्ही लष्करासाठी एअर कॉरिडोर बनवत आहोत. यात केवळ विमानांना उतरवण्याची व टेकऑफची मंजूरी दिली जाईल.’ तुर्कस्तानात २२०० वर्षे जुने गझियांटेप कॅसल उद्ध्वस्त झाले आहे. त्याची निर्मिती रोमन्सनी केली होती.
८४ वर्षांनंतर पुन्हा भयंकर आपत्ती... तेव्हा ३० हजार लोक ठार झाले होते
{तुर्कस्तानात पहाटे भूकंपाचा पहिला धक्का बसला तेव्हा लोक झोपेत होते. इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. लोक अजूनही ढिगाऱ्यांखाली दबले आहेत. हते विमानतळाची एकमेव धावपट्टीही उद्ध्वस्त झाली. या भागाच्या मालकानुसार, आता ती वापरण्यायोग्य नाही.
{१६६३ मधील मालट्यातील येनी मशीदही उद्ध्वस्त झाली. ती १६६५ मध्ये खुली झाली होती.
{तुर्कस्तानातील सर्व शिक्षण संस्था बंद केल्या आहेत. विमानतळेही बंद करण्यात आली आहेत.
{१९३९ मध्ये तुर्कस्तानात इतक्याच तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यात ३० हजार लोक ठार झाले होते.
ढिगाऱ्यातून मृतदेह काढण्याचे काम काही
दिवस चालेल. हजारो लोक बेपत्ता आहेत.
{पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्तानातील भूकंपामध्ये मृत झालेल्यांबद्दल शोक व्यक्त केला. भारताकडून मदतीसाठी साहित्यासह एनडीआरएफ व वैद्यकीय पथके तुर्कस्तानला जाणार आहेत.
तुर्कस्तानच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता
आर्थिक तंगीचा सामना करणाऱ्या तुर्कस्तानात मृतांची संख्या १० हजारांपर्यंत जाऊ शकते. देशाचे चलन लीरा लागोपाठ कमकुवत होत आहे. महागाई दर ५७% आहे. ८२८७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज अमेरिकेने वर्तवला आहे.
१० शहरे उद्ध्वस्त... तुर्कस्तानातील अंकारा, गाझियांटेपसह १० शहरांमध्ये पाच हजारांहून अधिक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.