आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
क्रोएशियाध्ये सलग दुसर्या दिवशी भूकंप आला आहे. आज(दि.29) आलेल्या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल होती. हवामान विभागानुसार, राजधानी जगरेबपासून 46 किलोमीटर दक्षिण-पूर्वमध्ये भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपामुळे इमारतींना खूप नुकसान पोहोचले आहे. याच परिसरात सोमवारी 5.2 तीव्रतेचा भूकंप आला होता.
लाइव्ह टेलीकास्टमध्ये दिसला भूकंप
Raggelante momento in cui la scossa di terremoto irrompe nella diretta tv in Croazia pic.twitter.com/3TqrJ1we7v
— Tancredi Palmeri (@tancredipalmeri) December 29, 2020
जगरेबमध्ये आलेले भूकंपाचे झटके संपूर्ण क्रोएशियामध्ये जाणवले. याशिवाय शेजारील देश स्लोवानिया, सर्बिया, बोस्नियामध्येही हा भूकंप जाणवल आहे. या भूकंपामुळे क्रोएशियातील क्रस्को न्यूक्लियर प्लांट बंद करण्यात आला आहे. पेंट्रिजा शहरातील अनेक घरे जमिनदोस्त झाली आहेत. मदतीसाठी सैन्याला पाचारण करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.