आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुर्कियेच्या अदियामन शहरात भूकंपानंतर 21 दिवसांनी एका घोड्याला वाचवण्यात यश आले आहे. 27 फेब्रुवारीला घोडा ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला. आता त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुर्की-सीरियामध्ये 6 फेब्रुवारीला 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. आतापर्यंत एकूण 50,325 लोकांचा मृत्यू झाला आहे. अदियामन हे भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या शहरांपैकी एक आहे.
उद्योगपती तनसु येगेन यांनी घोड्याच्या रेस्क्यूचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, आश्चर्यकारक, बचाव पथकाने 21 दिवसांनी घोड्याला ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढले. हा व्हिडिओ 34 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर काही युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, तुर्किये-सीरियातील प्राण्यांना अजूनही मदतीची गरज आहे. आणखी एका यूजरने लिहिले की, घोडा 21 दिवस पाण्याशिवाय जगला, हे आश्चर्यकारक आहे.
6 फेब्रुवारीला तीन मोठे भूकंप झाले
तुर्किये आणि सीरियामध्ये 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 3 मोठे भूकंप झाले. वेळेनुसार पहिला भूकंप पहाटे 4 वाजता (7.8), दुसरा सकाळी 10 वाजता (7.6) आणि तिसरा दुपारी 3 वाजता (6.0) झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्तानमधील गझियानटेप शहर होते. हे सीरिया सीमेपासून 90 किमी दूर आहे. त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या भागात अधिक विध्वंस झाला. तुर्कस्तानमध्ये आतापर्यंत 44,374 लोकांनी आपला जीव गमावला आहे. सीरियामध्ये 5,951 लोकांचा मृत्यू झाला आहे.
फोटोमध्ये पहा प्राण्यांची सुटका...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.