आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Eating Fruits And Vegetables In The Office Inspires Others, Youth Seems To Be The Right Way To Stay Healthy

अभ्यासाचे निष्कर्ष:ऑफिसमध्ये फळे, भाजी खाल्ल्यावर इतरांना मिळते प्रेरणा, तरुणाईस िनरोगी राहण्याची योग्य पद्धत वाटते

बर्लिनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फळे आणि भाज्या खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहते,असे म्हटले जाते. मात्र, हा केवळ पुस्तकी सल्लाच राहिला आहे. असे असताना आपल्या आसपासचे लोक याचे नियमित सेवन करत असतील तर तुम्हीही त्याचे अनुकरण करण्याची शक्यता आहे. जर्मनीच्या कोलोन विद्यापीठाच्या संशोधनात समोर आले की, व्यक्ती ज्या ठिकाणी काम करतो आणि तेथे त्याचा सहकारी फळ,भाज्या खात असेल तर तोही जंक फूड सोडून या पदार्थांचे सेवन सुरू करतो. संशोधनात दिसले की, कुटुंब किंवा शेजाऱ्यानेही तसे केल्यास त्यापासून व्यक्तीला प्रेरणा मिळते. मात्र, सहकाऱ्यातून जास्त प्रेरणा मिळते.

या मागचे मोठे कारण म्हणजे, एक व्यक्ती आपल्या सहकाऱ्यासोबत जास्त वेळ घालवत असतो, बोलत असतो. परिणामी, त्याची छाप त्याच्यावर जास्त पडते. ११३ संस्थांतील ४ हजाराहंून जास्त कर्मचाऱ्यांवर केलेल्या संशोधनात समोर आले की, कार्यालयीन काम करणाऱ्या लोकांकडे नियमित व्यायाम करण्याएवढा वेळ नसतो. यानंतर ते निरोगी राहण्यासाठी काय काय करता येईल यासाठी सहकाऱ्यांकडे पाहतात. भाज्या आणि फळांचे सेवन, याच पर्यायांपैकी एक आहे. ते सोपेही आहे. कारण, लोक त्याचे सेवन सुरू करायला लागतात. संशोधनानुसार,कामाच्या ठिकाणी लोकांचे रोल मॉडेल असतात व कॉपी करण्याचा प्रयत्न केला जातो. रोल मॉडेल आरोग्यदायक आहार घेत असल्यावर तेही तशी सुरुवात करतात.

युवांना निरोगी अन्न मागवण्यात लाजिरवाणे वाटते एका संशोधनात आढळले की, ब्रिटनमध्ये जेन झेडचे(१० ते २५ वयोगट) ४९% लोक मित्रांत दुग्धजन्य पदार्थ खाण्यास लाजतात. यासोबत ५५% खाण्याचे अपडेट सोशल मीडियावरही टाकतात.

बातम्या आणखी आहेत...