आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यास फक्त वजनच कमी होणार नाही तर डोके व शरीरही ताजेतवाने होते. यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. बहुतेक तुम्ही अशा दुर्मिळ व्यक्तींपैकी असाल जी सध्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे १०० टक्के क्षमतेने काम करत असेल. जर असे नसेल तर तुम्हाला जेवणाच्या ताटाकडे बघण्याची गरज आहे. यामुळे तुमची उत्पादकता वाढण्यात खूप मदत होऊ शकते. न्यूयॉर्क विद्यापीठातील मानद प्राध्यापक मॅरियल नेस्ले यांचे म्हणणे आहे की, आपणा सर्वांना मन-मेंदू प्रसन्न ठेवण्यासाठी कॅलरीजची गरज असते, पण एवढी नव्हे की आपणच त्रस्त होऊन जाऊ. लोकांवर आहाराचा काय परिणाम होतो यावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मागील एक दशकापासून १.३४ लाख कोटी रुपये खर्च करून संशोधन करत आहे.
खाण्यापिण्यामुळे आपण आळशी तर होत नाहीत ना, याची आपणाला जाणीव असायला हवी असे तज्ञांना वाटते. शरीराला पोषक तत्त्व मिळत राहावेत आणि प्रक्रिया केलेले अन्न कमी केले जावे, हा त्यामागील हेतू आहे. यामुळे चयापचय तर प्रभावित होतेच, शरीराचे पोषणही होत नाही. खाण्यापिण्याच्या या तीन पद्धती आपले ध्येय गाठण्यात मोठ्या प्रमाणात मदत करू शकतात.
नो अॅडेड शुगर : असा आहार न घेणे ज्यात साखर वरून टाकण्यात आली असेल.
उत्पादकता : शरीरात जाताच साखर इन्शुलिन सोडण्यास प्रवृत्त करते. ही अतिरिक्त साखर कमी करण्याचा प्रयत्न लिव्हर करते. म्हणजे शरीराला खूप काम करावे लागते. यासाठी मेंदू सतर्क होतो. नेस्लेनुसार तुमच्यासाठी काय खाणे योग्य आहे याचा संकेत तुम्हाला शरीर चांगल्या प्रकारे देत असते.
केटो आहार : यात बहुतांशी फॅट, काही प्रमाणात प्रोटीन व कार्बोहायड्रेट्स असतात. हे खाणे शरीराला केटोसिस अवस्थेत घेऊन जाते. यात शरीर त्याचा प्राथमिक स्रोत म्हणून फॅट बर्न करतो.
उत्पादकता : यूसीएलए सेंटर फॉर ह्यूमन न्यूट्रिशनच्या संचालक झाउपिंग ली यांच्यानुसार या स्थितीत शरीर स्वत:ला जुळवून घेत असते, यामुळे काहींना उत्साही व स्थिर वाटते.
थोडाच वेळ खाणे : राेज ४ ते ८ तासांच्या अंतराने खाणे. ( कॅलरीमुक्त पेय घेऊ शकता)
उत्पादकता : उच्च पातळीची दक्षता, उपाशी राहिल्यास तुमचे शरीर खाण्यासाठी वेगळ्या पद्धतीने सक्रिय राहते. सतर्कता वाढते. यामुळे काहींमध्ये साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते. कंप किंवा चिंता जाणवू शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.