आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Economic Crisis Raises Headaches For Neighboring Power Crisis Deepens In Pakistan, Record Inflation Flares

आर्थिक संकटामुळे शेजारी राष्ट्रांची डोकेदुखी वाढली:पाकिस्‍तानमध्‍ये वीज संकट गहिरेे, विक्रमी  महागाईचा  भडका

इस्लामाबाद | नासिर अब्बासएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. वास्तविक आधीपासून आर्थिक संकटाला ताेंड देणाऱ्या जनतेसमाेर आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. अलीकडेच मंत्रिमंडळाची बैठकदेखील अंधारात झाली. यातून देशभरात वीज बचतीचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. सरकारने वीज बचतीसाठी विस्तृत आराखडा तयार केला आहे. सरकारी विभागाद्वारे वापरल्या जाणाऱ्या एकूण विजेपैकी ३० टक्के विजेच्या बचतीची याेजना आखली आहे. यातून ६२ काेटी रुपयांची बचत हाेईल, असे पाक सरकारला वाटते. सरकारने रात्री ८.३० पर्यंतच बाजारपेठा चालू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्याचा विक्री व उत्पादनाला फटका बसू लागला आहे. परंतु यातून ६० अब्ज रुपयांची बचत हाेईल, असा सरकारचा दावा आहे. संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, फेब्रुवारीपासून पारंपरिक बल्बचे उत्पादन बंद केले जाईल. जास्त वीज लागणाऱ्या पंख्यांचे उत्पादन जुलैपासून बंद केले जाईल. यातून सुमारे २२ अब्ज रुपये बचत करण्यासाठी मदत हाेईल. बलुचिस्तानमध्ये १०-१२ तासांपर्यंत भारनियमन वाढवण्यात आले आहे. खैबर पख्तुनख्वामध्येही भारनियमन ६ ते १२ तास करण्यात आले आहे. आधीच आर्थिक तंगी असताना या समस्येला ताेंड देण्याची वेळ आली आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. बलुचिस्तानमध्य उणे १५ अंश तर खैबर पख्तुनख्वामध्ये ३ अंश तापमान आहे. दाेन्ही प्रांतांत रक्त गाेठवणारी थंडी आहे. परंतु वीज संकटामुळे लाेकांना काही उपाययाेजनाही करता येत नाही. वीज बिलांत दुपटीने वाढ झाली आहे.

महागाई : इम्रान सरकार गेल्यानंतर वाणसामानाचे दर झाले दुप्पट
वस्तू 2022 2023
आटा 26 51
तांदूळ 33 66
साखर 29 33
पेट्रोल 55 79
तूप/तेल 162 200

* हे दर भारतीय रुपयांत प्रति किलो किंवा लिटरनुसार

विपक्ष: पीटीआयशासित राज्यांनी वीज बचत याेजनांना नाकारले
पंजाब व खैबर पख्तुनख्वा प्रांतातील राज्य सरकारांनी वीज बचतीच्या केंद्रातील आराखड्याला नाकारले आहे. कारण माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ(पीटीआय) पक्ष या राज्यांत सत्तेवर आहे. पंजाबमधील वरिष्ठ मंत्री मियां अस्लम इक्बाल भास्करला म्हणाले, सरकारचा रात्री ८.३० वाजता बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय मुळीच मान्य नाही. आम्ही आमच्याकडून रात्री ८ वाजताची वेळ निश्चित करू. वीज बचतीचा आराखडा करताना केंद्राने आमचा सल्ला घेतला नव्हता. त्यामुळे याेजना मान्य केली जाणार नाही, असे खैबर पख्तुनख्वा सरकारने स्पष्ट केले.

विरोध: व्यापार संघटनाही पाक सरकारच्या विराेधात उतरल्या
पाकिस्तानातील बहुतांश व्यापाऱ्यांनी वीज बचत याेजनेला विराेध केला आहे. राजधानी इस्लामाबादमध्ये ट्रेड युनियने ही याेजना लागू करणार नसल्याचे जाहीर करून टाकले. संघटनेचे प्रतिनिधी नाेमान अब्बास भास्करला म्हणाले, गरीब आणखी गरीब हाेत आहे. व्यापार आधीच संपण्याच्या मार्गावर आहे. मला पाक सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे. सरकार जाहीर सभांसाठी विमान, हेलिकाॅप्टरचा वापर करणे बंद करेल का? ते थांबवले तरी अब्जावधी रुपयांची बचत हाेईल. वीज बचतीच्या नावाखाली कराचीतील बाजारपेठ रात्री ८ वाजता बंद करणे याेग्य हाेणार नाही, असे अंजुमन-ए-ताजिरानच्या सिंध भागाचे प्रवक्ते माेहंमद इस्माईल लालपुरिया यांनी म्हटले आहे. देशातील अनेक शहरांत व्यापारी संघटना सरकारच्या विराेधात रस्त्यावर उतरल्या आहेत. बाजारपेठ बंद झाल्यास विक्रीवर त्याचा वाईट परिणाम हाेईल. यातून उत्पादनही घटेल. त्याचा थेट फटका उद्याेग क्षेत्राला बसेल. वीज बचतीसाठी हिताची याेजना बनवावी.

बातम्या आणखी आहेत...