आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Education Loan Waiver Of Rs 46 Lakh For 1.1 Lakh People In Public Service, From Biden Administration

अमेरिका:जनसेवेतील 1.1 लाख लोकांचे ४६ लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज माफ, बायडेन प्रशासनाकडून

दिलासा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशेष करारांतर्गत फक्त दिव्य मराठीत मध्यावधी निवडणुकीपूर्वी राष्ट्रपती जो बायडेन प्रशासनाने सार्वजनिक सेवेसाठी सज्ज कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अमेरिकेच्या शिक्षण विभागाने लोकसेवा कर्जमाफी योजनेत अस्थायी बदल करत १,१०,००० पेक्षा जास्त लोकांचे शैक्षणिक कर्ज माफ केले आहे. योजनेत ६.८ अब्ज डॉलरचा (सुमारे ५२ हजार कोटी) दिलासा दिला आहे. शिक्षण विभागानुसार, प्रत्येकी कर्जमाफी सरासरी ६०,००० डॉलर (सुमारे ४६ लाख रुपये) इतकी आहे. सार्वजनिक सेवेत कर्जमाफी तत्कालीन राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी २००७ मध्ये मंजुरी दिली होती. याअंतर्गत एनजीओ, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक कर्ज १० वर्षे किंवा १२० हफ्त्यांत फेडल्यानंतर आपोआप माफ होऊ शकते. या योजनेंतर्गत एक चतुर्थांश अमेरिकन कर्मचारी पात्र ठरू शकतात.

बातम्या आणखी आहेत...