आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Ego Hinders Men In Friendship, Less Contact As Soon As They Leave The City, But Women Maintain Relationships Throughout Life

दिव्य मराठी विशेष:मैत्रीत पुरुषांना अहंकाराची बाधा, शहर साेडताच संपर्क कमी, पण महिला आयुष्यभर नाते जपतात

लंडन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरुष व महिलांमध्ये मैत्रीच्या बाबतीत भिन्न स्वरूपातील नाते दिसून येते. महिला भावनात्मकदृष्ट्या मैत्री करतात. मैत्री पुरुषांना मात्र अहंकाराची बाधा हाेते. पुरुष शहर साेडल्यानंतर त्यांचा मित्रांशी असलेला संपर्क कमी हाेताे. महिला मात्र िववाहानंतरही आपल्या मैत्रिणींच्या संपर्कात राहतात. किंबहुना आयुष्यभर हे नाते जपण्याचे काम करतात. मैत्रीच्या संबंधाचा ५० वर्षांपासून अभ्यास करणाऱ्या आॅक्सफर्डचे मानसतज्ज्ञ राॅबिन डनबर यांनी विषयात संशाेधन मांडले आहे. कमी वयातच मुले व मुलींच्या मैत्रीचे नाते जपण्यातील फरक लक्षात येताे. मुलींची मैत्री सामान्यपणे संवादावर आधारित असते. मुलांची मैत्री कॅज्युअल स्वरूपाची असते. पुरुषांच्या दृष्टीने आपल्यासाेबत काेण आहे याला जास्त महत्त्व असते. भलेही मग ती व्यक्ती नाइट पार्टी, क्लब किंवा फुटबाॅल खेळण्यापुरते साेबत असली तरी पुरुषांना पुरेसे असते. नात्यामधील या फरकामागे संगाेपनाचेही एक कारण आहे. डनबर यांनी टीमच्या मदतीने फेसबुकवरील हजाराे लाेकांच्या छायाचित्रांचा डेटा गाेळा केला. त्यात महिला मित्रांसमवेतचे छायाचित्र टाकतात असे दिसून आले. त्यांच्या प्राेफाइलमध्ये दाेन जणांची छायाचित्रे पाहायला मिळू शकतात. पुरुष मात्र इतर पुरुषांसाेबतचे ग्रुप फाेटाे प्राेफाइलला टाकतात. पुरुष आपल्यासाेबत सर्वात चांगला मित्र किंवा पत्नीचे छायाचित्र फार कमी वेळा टाकतात.

आॅक्सिटाेसिनच्या कमतरतेनेे संपर्क कमी किंवा वाढताे तणाव वाटल्यास महिला वयाने कमी असलेल्या लाेकांशी मैत्री करतात. दीर्घायू हाेण्याची त्यांची इच्छा असते. पुरुषांत असे नाही. त्यांना नशेची सवय लागते. मेंदूतील आॅक्सिटाेसिनच्या कमतरतेमुळे संपर्क वाढताे किंवा कमी हाेऊ शकताे.

बातम्या आणखी आहेत...